'The King' या मुंबईकर हिप हॉप डान्स ग्रुपने जिंकला अमेरिकन 'World of Dance'हा रिअ‍ॅलिटी शो
The Kings win World of Dance show (Photo Credits: Video grab)

World of Dance 2019 Winner: संगीत आणि कलाक्षेत्राला भाषेचं बंधन नसतं त्यामुळे जगाच्या कोणत्याही टोकावर गेलं तरीही त्याची शैली भुरळ पाडणारी असते. नुकतेच मुंबईच्या 'The King' या हिप हॉप ग्रुपने अमेरिकेतील ' World of Dance'हा रिअ‍ॅलिटीशो जिंकला आहे. 14 सदस्यीय या संघाने एक मिलियन डॉलर्सचं बक्षीस जिंकले आहे.

12 आठवडे दमदार परफॉर्मन्स, कठोर मेहनत केल्यानंतर 'The King'या संघाने कॅनडाच्या कंटेम्परी डान्स करणारी बहिणींची जोडी, फिलिपाईन्सचा हिप हॉप ग्रुप आणि कॅलिफोर्निया एका संघावर मात केली आहे.

'The King'या संघाने यापूर्वी India’s Got Talent जिंकलं आहे. तसंच 2015 साली World Hip-Hop Dance Championship मध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावलं आहे. अमेरिकन रसिकांसोबतच परीक्षकांनाही 'The King'ने बॉलिवूड हिप हॉपचे वेड लावलं आहे.

'The King'या हिप हॉप संघामध्ये 17-27 या वयोगटातील 14 सदस्यांचा समावेश आहे. 2008 साली या संघाची निर्मिती करण्यात आली आहे.