Mumbai's Trending Auto Rickshaw (Photo Credits: ANI)

मुंबई  उपनगरात (Mumbai Suburbs)  फिरणाऱ्या काळ्या- पिवळ्या रंगातील रिक्षा (Autorickshaw) या मुंबईकरांच्या प्रवासाचा एक अविभाज्य भाग आहेत. कमी अंतरावर प्रवास करताना पैसे बचत आणि कम्फर्ट अशी सोय या रिक्षांच्या मार्फत साधता येते. अनेक ठिकाणी तर गाणी वाजवणाऱ्या ढिंचॅक रिक्षांच्या मार्फत मनोरंजनाची सुद्धा तरतूद केलेली असते. पण याहीपेक्षा काहीतरी हटके करण्याच्या उद्देशाने अलीकडेच मुंबईतील सत्यवान गीते (Satyavan Geete) या रिक्षाचालकाने आपल्या प्रवाशांसाठी आपल्या रिक्षाचं रुपडं पालटलंय. गीते यांच्या रिक्षामध्ये वॉश बेसिन, मोबाईलचा चार्जिंग पॉईंट (Mobile Charging Point), छोटीछोटी झाडेझुडुपे, डेस्कटॉप मॉनिटर (Monitor), शुद्ध पाणी देणारा प्युरिफायर, कुलर, अशा सर्व सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. इतकंच नव्हे तर या रिक्षातून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 1 किमी पर्यंतचा प्रवास हा मोफत करता येणार आहे.

सत्यवान गीते यांनी आपल्या रिक्षाबद्दल माहिती देताना सांगितले की, ही मुंबईतील पहिलीच अद्ययावत रिक्षा असून प्रवाशांची फेव्हरेट आहे, यामध्ये तुम्हाला शुद्ध पाणी, फोन चार्जिंग व अन्य अनेक सुविधा मिळतात, हे करण्याचे उद्दिष्ट इतकेच कि मला प्रवाशांना उत्तमसेवा पुरवायची आहे. गीते यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. 'कचरा सुका और गिल्ला'... PMC चे सफाई कामगार महादेव जाधव सोशल मीडियावर व्हायरल; कचर्‍याच्या वर्गीकरणावर करत आहेत खास गाण्यामधून जागृती

ANI ट्विट

(Watch Video)

जसं की तुम्ही फोटो मध्ये पाहू शकता की गीते यांनी रिक्षामध्ये अगदी छोट्याश्या जागेत झाडांपासून ते मॉनिटर पर्यंत सर्व काही अगदी कमालीने बसवले आहे. संबंधित रिक्षा ही पूर्व उपनगरातील असून असाच प्रकारे काही दिवसांपूर्वी अंधारी भागात सुद्धा वायफाय पुरवणारी रिक्षा आढळून आली होती. प्रवाशांची सोय आणि व्यवसायात वाढ होण्यासाठी हा हटके पर्याय रिक्षा चालक निवडताना दिसत आहेत.