एका मुजोर रिक्षाचालकाची मुजोरी व्हायरल (Auto Rickshaw Viral Video) व्हिडिओमुळे पुढे आली आहे. मुंबई (Mumbai) शहरातील शिवाजीनगर (Shivajinagar) परिसरातील महामार्गावर ही घटना 17 डिसेंबरच्या दुपारी 2 च्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल Viral Video In Mumbai) झाला आहे. तसेच, या रिक्षाचालकावर (Mumbai Rickshaw Driver) कारवाई व्हावी अशी जोरदार मागणीही होऊ लागली आहे. कट मारल्याच्या रागातून ही घटना घडल्याचे समजते. रिक्षाचालकाने थेट बाइकस्वाराच्या अंगावरच रिक्षा घातली. यात बाइकस्वार बाईकवरुन खाली पडला. पाठीमागच्या वाहनचालकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र, रिक्षा चालकाची चूक बाइकस्वाराच्या जीवावर बेतली.
व्हिडिओत दिसणारी अगदी क्षणार्धात घडलेली ही घटना अंगावर शहारे आणते. कट मारल्याबाबत एका बाईकस्वाराने रिक्षावाल्याला सिग्नलवर थांबल्यावर जाब विचारला. या वेळी रिक्षाचालक आणि बाईकस्वार यांच्यात काही बाचाबाचीही झाली. तेवढ्यात सिग्नल पडला आणि वाहने पुढे जाऊ लागली. बाइकस्वार आणि रिक्षाचालक दोघेही आपली वाहने घेऊन पुढे निघाले. सिग्नलपासून काही अंतर पुढे गेल्यावर रिक्षावाल्याने अचानकपणे आपली रीक्षा वळवली आणि रीक्षा बाइकस्वाराच्या अंगावर घालत बाईकला धक्का दिला. बाइकस्वार जागेवरच बाइकसह कोसळला. रिक्षावाला पुढे भरधाव निघून गेला. (हेही वाचा, बोगस, मुजोर रिक्षा चालकांवर कारवाई; रिक्षा प्रवासाच्या तक्रारीसाठी टोल फ्री नंबर जारी)
मुंबईत रिक्षाचालकाची मुजोरी! कट मारल्याच्या वादातून बाईकस्वाराला उडवलं, बघा धक्कादायक व्हिडिओ...#Mumbai #AutoRickshaw #ViralVideo #MumbaiPolice @MumbaiPolice pic.twitter.com/WLWJUuWEBh
— LoksattaLive (@LoksattaLive) December 24, 2020
दरम्यान, पाठिमागून येणाऱ्या वाहनचालकांनी प्रसंगावधान दाखवत वाहने थांबवली. काहींनी दुसऱ्या बाजूला वळवली. त्यामुळे अनर्थ टळला. बाइकस्वाराचे प्राण वाचले खऱे. पण रहदारीचा फायदा घेऊन रिक्षाचालक मात्र पसार झाला. कोणत्यातरी सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला आणि हे प्रकरण पुढे आले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतील रिक्षाचालकावर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरत आहे.