Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Mumbai: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुण वेगवान टॅक्सीच्या छतावर बसून टॅक्सी चालकाला गाडी थांबवण्यास सांगत आहे. हा व्हिडिओ सांताक्रूझच्या उड्डाणपुलाचा आहे. काही लोकांनी त्यांच्या मोबाईलवर या व्यक्तीचा व्हिडिओ बनवला. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, वर बसलेली व्यक्ती ड्रायव्हरला 'गाडी बाजूला थांबवा' असे सांगत आहे. यानंतर दुसरा वाहनधारक त्याला 'काय झाले?', असे विचारतो, तर वर बसलेला तरुण म्हणतो, 'तो अपघातानंतर पळून जात होता.' यानंतर वर बसलेला तरुण म्हणतो, पोलिसांना बोलवा. यावेळी टॅक्सीच्या पुढील काचाही फुटल्याचे दिसून येते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया X वर @ZeeBusiness नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

येथे पाहा, घटनेचा व्हिडीओ