Mother Hen Fight With Snake Viral Video: कोंबडीने ठेचला नागाचा फणा, पिल्लांना वाचविण्यासाठी आईचा रुद्रावतार, पाहा व्हिडिओ
Hen Fight With Snake | (Photo Credit - Twitter)

आपल्या पिल्लांना वाचविण्यासाठी आई कोणत्याही थराला जाऊ शकते. मग ती आई प्राणी असो की मनुष्यप्राणी. असाच एक जबरदस्त व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडिओत आपल्या पिलांवर चाल करुन आलेल्या एका नागाचा फणा आई असलेली कोंबडी (Mother Hen Fight With Snake Viral Video) चांगलाच ठेचताना दिसते. आपल्या पिल्लांना वाचविण्यासाठी आपला जीव धोक्यात घालणाऱ्या आईचा रुद्रावतार पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत. आई आणि पिल्लांच्या नात्याचा सुरेख संगम दाखवणारा हा हृदयस्पर्षी व्हिडिओ आतापर्यंत अनेकांनी पाहिला आहे.

ट्विटरवर @ViralPosts नावाच्या युजरने शेअर केलेला हा व्हिडिओ दोन प्राणांमधली जगण्याची आणि टिकून राहण्याची झुंज आणि संघर्षही दर्शवतो. नागाला पोट भरण्यासाठी कोंबडीची पिल्ले खायची आहेत. त्यासाठीच तो तेथे आला आहे. तर आपल्या पिल्यांना कोणाचे तरी भक्ष्य होण्यापासून आईला त्यांना वाचवायचे आहे. यातूनच सुरु होते एक जीवघेणा संघर्ष. या संघर्षात कोण जिंकते ते आपणच पाहा. या व्हिडिओच्या माध्यमातून. (हेही वाचा, Nashik: बायकोच्या त्रासाला वैतागून घेतला सापाचा मुका; सर्पमित्राचा मृत्यू)

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आई असलेली कोंबडी कोब्रा प्रजातीतील अत्यंत विषारी नागावर आक्रमकपणे हल्ला करताना दिसत आहे. ती तिच्या पंखांनी आणि चोचीने सापावर हल्ला करते. व्हिडिओच्या शेवटी विषारी सापाने कोंबडीचा ताबा घेतल्याचेही पाहायला मिळते. पण, क्षणार्धातच कोंबडी पुन्हा नव्या जोमाने नागावर तूटून पडते आणि पुढच्या काही क्षणातच साप माघार घेतो. परिणामी कोंबडी आणि पिल्लांचेही प्राण वाचतात.

ट्विट

ट्विटरवर काही दिवसांपूर्वी हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तेव्हापासून या व्हिडिओला 300,000 हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक इंटरनेट वापरकर्त्यांनी कोंबडीच्या शौर्याचे कौतुक केले, तर काहींनी आईच्या प्रेमाचे कौतुक केले. काहींनी सापावर हल्ला करण्यासाठी पक्षी किती हुशार आहे याबद्दल लिहिले.

एका ट्विटर युजरने लिहिले आहे की, ही जगातील सर्वोत्तम आई आहे. दुसऱ्याने म्हटले आहे की, अशा प्रकारे कोंबडीच तिच्या पिलांना भक्षकांपासून वाचवते आहे. मात्र पाळणारे खुशाल आहेत.” तिसऱ्याने लिहिले. "मातृप्रेम ही भीतीपेक्षा एक मजबूत भावना आहे आणि ती खरोखरच सर्वात भव्य आणि शक्तिशाली आहे.