विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Photo Credits: IANS and Facebook)

इंस्टाग्राम (Instagram)  हे केवळ तरुणाईचं टाईमपास करण्याचं आणि सेल्फी पोस्ट करायचं माध्यम नाही. दिवसेंदिवस बदलत जाणाऱ्या फीचर्सममुळे आता इंस्टाग्रामचा अनेक विविध प्रकारे वापर करता येऊ शकतो. तरुणाईपासून जगभरातील आघाडीचे नेते इंस्टाग्रामचा वापर करतात. दिवसभराचं शेड्युल ते विविध भेटी गाठीचे फोटो सोशल मीडियामध्ये नेते मंडळी देखील उत्साहाने शेअर करतात. इंस्टाग्रामवर अग्रगण्य नेत्यामंध्ये यंदाच्या वर्ष नरेंद्र मोदी यांची वर्णी लागली आहे. नरेंद्र मोदींचे इंस्टाग्रामवर सर्वाधिक म्हणजे 15.4 million फॉलोवर्स आहेत, त्यापाठोपाठ इंडोनेशियाचे पंतप्रधान Joko Widodo (14 million) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump (10.9 million) यांचा क्रमांक लागतो.

अनुष्का विराटच्या फोटोवर सर्वाधिक लाईक्स

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा मागील वर्षी इटलीत गुपचूप विवाहबंधनात अडकले. भारतात परतल्यावर त्यांनी खास रिसेप्शन ठेवलं होते. या रिसेप्शन पार्टीचं आमंत्रण देण्यासाठी विराट आणि अनुष्का खास नरेंद्र मोदींच्या कार्यालयात पोहाहचले होते, मोदींनी देखील त्याचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो यंदा सर्वाधिक लाईक्स मिळवणारा ठरला आहे. 1.85+ million हून अधिक लाईक्स या फोटोला मिळाले आहेत.

Most Liked Photo on Instagram (by a World Leader): विराट कोहली आणि अनुष्का शर्मा 

 

View this post on Instagram

 

Met @virat.kohli and @anushkasharma. Congratulated them on their wedding.

A post shared by Narendra Modi (@narendramodi) on

Second-Most Liked Photo on Instagram (by a World Leader) नरेंद्र मोंदींच्या स्वित्झर्लंड भेटीचा फोटो 

तर नरेंद्र मोंदींच्या स्वित्झर्लंड भेटीचा फोटो हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. नरेंद्र मोदी या इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोवर्स असणाऱ्या युजर कडून सर्वाधिक लाईक्स मिळवणारे फोटो सध्या सर्वत्र चर्चेमध्ये आहेत. नरेंद्र मोदींच्या या फोटोला 1,635,978 likes आहेत.