Momos Chai Video: प्रयोग ही शोधाची जननी आहे, असं म्हणतात. नवीन प्रयोग करणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु कधीकधी काही लोक अन्नावर अशा प्रकारे प्रयोग करतात की, हे पाहताना लोकांना राग अनावर होतो. असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती मोमोज चहा बनवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चहामध्ये मोमोज बनवताना दिसत आहे. हे अगदी विचित्र आहे. कारण चहा आणि मोमोजचं कॉम्बिनेशन कुठेचं सुट होत नाही. सध्या सोशल मीडियावर मोमोज चायचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून लोक त्यावर संतापजनक प्रतिक्रिया नोंदवत आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)