व्यक्तीच्या शिखातील मोबाईलचा अचानक स्फोट, Viral Video पहा नेमके काय घडले
Smartphone Blast (Photo Credits: Facebook)

Viral Video: सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या दरम्यान फोन हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा अटक बनला आहे. मोबाईल शिवाय एक मिनिट सुद्धा बाजूला राहणे सध्या लोकांना जमत नाही. अशातच आता एका व्यक्तीच्या शिखातील मोबाईलचा अचानक स्फोट झाला. याच संदर्भातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत एका व्यक्तीने आपल्या शर्टाच्या शिखात मोबाइल ठेवला. तेव्हाच अचानक फोनचा स्फोट होत त्यामधून धूर निघू लागला.

सोशल मीडियात हा व्हिडिओ खुप व्हायरल झाला आहे. Dahyu Mali नावाच्या युजर्सने शेअर केला असून त्याला आतापर्यंत 6.9M लोकांनी पाहिले आहे. तर 365K लोकांनी त्याला पसंद केले आहे. ही घटना राधनपुर येथील असून लोकांनी तो खुप शेअर केला आहे.(Blue Lobster, Scotland मध्ये मच्छिमाराच्या जाळ्यात आला 20 लाखात एक आढळणारा दुर्मिळ लॉबस्टर)

व्हिडिओ मध्ये पाहता येईल की, काही लोक दुकानाच्या आतमध्ये आहेत. एक व्यक्ती खुर्चीवर बसलेला आहे. त्याने फोन शर्टाच्या शिखात ठेवला असून एकमेकांसोबत गप्पा मारत होते. त्याचवेळी अचानक मोबाइलचा स्फोट झाला. स्फोट झाल्याने खळबळ उडाली. व्यक्ती आपल्या खिशातील मोबाइल तातडीने दुकानाच्या बाहेर फेकून दिला.