Transgender (Photo Credits: PTI (Representational Photo)

Uttar Pradesh: वयाच्या 60 व्या वर्षी लग्न झाल्यानंतर पत्नी ट्रान्सजेंडर (Transgender) असल्याची माहिती समोर आल्याने वृध्दाला मोठा धक्का बसला. आता या वृद्धांने व्हिडिओ व्हायरल करून पोलिसांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. त्याने पत्नी आणि तिच्या भावावर आरोप केले आहेत. कानपूरच्या बिधनू येथील एका वृद्धाचा व्हिडिओ इंटरनेट मीडियाच्या सोशल प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये 60 वर्षांच्या वृद्धाने ट्रान्सजेंडर पत्नीकडून होणाऱ्या अन्यायातून सुटका करून घेण्याची मागणी पोलिस स्टेशनसह मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडे केली आहे. व्हिडिओमध्ये दिसणारा वृद्ध बिधनू मझवान चौकी परिसरातील भारू बंगला गावचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये वृद्धाने सांगितले की, 2016 मध्ये त्यांच्या पहिल्या पत्नीचा अकाली मृत्यू झाला होता. त्यानंतर 2017 मध्ये काही नातेवाईकांच्या सांगण्यावरून त्याने अनिता कश्यपसोबत दुसरे लग्न केले. लग्नानंतर त्याला त्याची पत्नी ट्रान्सजेंडर असल्याचं समजल्यानंतर मोठा धक्का बसला. (हेही वाचा -Himachal Chakki Railway Bridge Collapsed: हिमाचल आणि पंजाबला जोडणारा चक्की रेल्वे पूल कोसळला; Watch Video)

अनितासह तिचे वडील बाबुराम आणि भाऊ सनी, मिथुन, सुनील यांनी मालमत्ता आपल्या नावावर करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. घरे व दवाखाने बळजबरीने ताब्यात घेऊन त्यांना बेघर केले. आता पत्नी आणि तिचा भाऊ क्लिनिकमध्ये बसू लागले. त्यामुळे एखाद्या रुग्णासोबत अघटीत घटना घडू शकते. त्यामुळे वृद्धाने मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांसह पोलिसांकडे न्याय मागितला आहे.

गुरुवारी वकिलाला भेटण्यासाठी कोर्टात गेलेल्या वृद्धाची तब्येत बिघडल्याने ते अचानक जमिनीवर पडले. त्यावर त्यांना शहरातील नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले आहे. न्याय न मिळाल्यास आत्महत्या करण्यास भाग पाडू नका, असे या वृद्धाचे म्हणणे आहे. पोलीस स्टेशन प्रभारी प्रकाश चंद्र शर्मा यांनी घटनेची माहिती नाकारली असून तक्रार आल्यानंतर तपास करून कारवाई केली जाईल असे सांगितले.