डोक्यात सहा इंच चाकू घुसला, तरीही सायकल चालविली
Shaun Wyan ( फोटो सौजन्य - ट्विटर )

दक्षिण अफ्रिकेमध्ये एका तरुणावर चोरांनी हल्ला करुन त्याच्या डोक्यात सहा इंच चाकू घुसवल्याची धक्कादयक घटना घडली आहे. तरीही या तरुणाने गंभीर अवस्थेत जखमी झाल्यावर सायकल चालवून स्वत:वर उपचार करुन घेतले आहेत.

शाऊन वॅन (Shaun Wayne) असे या तरुणाचे नाव आहे. शाऊन हा रोजच्या प्रमाणे साकलवरुन ऑफिसला जाण्यास निघाला होता. मात्र त्यावेळी काही चोरांनी त्याची वाट अडवून त्याचाकडील सायकल चोरी करण्याचा प्रयत्न केला. तसेच या दोघांमध्ये जबर मारहाण झाल्यानंतर चोरांनी शुआनच्या डोक्यावर चाकू हल्ला केला. या चाकू हल्ला एवढा तीक्ष्ण होता की, शाऊनच्या डोक्यात तो 6 इंचाचा चाकू घुसला.

तर या प्रकरणी शाऊनने हिंमतीने पुन्हा सायकल चालवण्यास सुरुवात करुन दवाखान्यापर्यंत पोहचला. दवाखान्यातील डॉक्टरांनी त्याला या अवस्थेत पाहिल्यावर त्यांना विश्वास बसला नाही. मात्र उपचार घेतल्यावर शाऊनच्या डोक्यातील चाकू बाहेर काढण्यात आला आहे. तर पोलीस या घटनेतील आरोपींचा शोध घेत आहेत.