Beach House मध्ये पार्टी सुरु असताना लोकांनी भरलेली बाल्कनी अचानक कोसळली; Viral Video द्वारे पहा घटनेचा थरार
Viral Video Screenshot (Photo Credits: Twitter)

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मालीबू (Malibu) बीच वरील हा व्हिडिओ आहे. मालीबू येथील एका बीच हाऊसमध्ये पार्टी सुरु होती. पार्टी करणारे अनेकजण बाल्कनीत आले. त्यांची मज्जा मस्ती सुरु असताना अचानक बाल्कनी लोकांसह खडकांवर कोसळले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी या घरात बर्थडे पार्टी सुरु होती. यात तब्बल 15 लोक सहभागी झाले होते. मात्र अचानक बाल्कनी कोसळली.

रिपोर्टनुसार, या अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून अन्य पाचजणांवर उपचार सुरु आहेत. सुदैवाने या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नाही. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तीने सांगितले की, मी काहीतर कोसळल्याचा मोठा आवाज ऐकला आणि माझ्या डोळ्यासमोर माझा जीवलग मित्र व प्रेयसी खाली खडकांवर पडताना पाहिले. डेक पूर्णपणे तुटला होत. यापेक्षाही काही वाईट घडू शकले असते. हे खूपच भयानक होते.  अगदी वेगळाच अपघात होता. मला ठाऊक नाही, हे नेमके कसे झाले.

पहा व्हिडिओ:

न्यूयॉर्क पोस्टनुसार, फक्त 6 लोकांच्या उपस्थितीच्या मर्यादेवर विकेंडसाठी घर भाड्याने देण्यात आल्याचे घरमालकाने सांगितले. त्याचबरोबर पार्टी न करण्याच्या सूचनाही त्यांना देण्यात आल्या होत्या. दरम्यान, शेजारच्यांनी घरमालकाला घरात पार्टी सुरु असल्याचे फोनवरुन सांगितले. त्यानंतर घरमालकाने भाडेकरुनला अनेकदा कॉल्स केले आणि त्यांना घर खाली करण्यास सांगितले. परंतु, त्यांनी ऐकले नाही आणि त्या फोननंतर सुमारे 15 मिनिटांत ही दुर्घटना घडली. अधिक लोकांच्या वजनामुळे डेक कोसळला असल्याचे अन्वषेकांचे म्हणणे आहे. अग्निशमन दलाने घर सील केले आहे.