Christmas 2019: Jingle Bells गाण्याचे पुणेरी व्हर्जन; नऊवारीतील चिमुकलीचा व्हिडिओ सोशल मिडियावर होतोय व्हायरल; Watch Video
Jingle Bells (Photo Credits: YouTube Gra)

ख्रिसमसचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळत आहेत. ख्रिसमस म्हटला की अगदी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या तोंडी एकच गाणे गुणगुणले जाते, ते म्हणजे 'जिंगल बेल्स' (Jingle Bells). या गाण्यात एक वेगळीच मजा आहे. मात्र या गाण्याची प्रसिद्ध लक्षात घेता या गाण्याचे हिंदी आणि मराठी व्हर्जन देखील आले आहे. ही व्हर्जन ऐकण्यात आणि ती बोलण्यात एक वेगळीच मजा येत आहे. याच व्हर्जनचा एक पुढचा टप्पा म्हणून या गाण्याचे आता पुणेरी व्हर्जन आले आहे. हे व्हर्जन नऊवारी नेसलेल्या एका चिमुकलीने चक्क Saxophone या वाद्यावर वाजवले आहे. त्यामुळे जिंगल बेल्स या गाण्याची धुन काही तरी वेगळीच आणि भन्नाट येत आहे. हा व्हिडियो सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

जिंगल बेल्स या गाण्याचे आतापर्यंत अनेक विदेशी भाषेत व्हर्जन आले. त्यानंतर देशी व्हर्जनमध्ये गुजराती, मराठी आणि भोजपुरी व्हर्जनही आले. मात्र सध्या या सर्व व्हर्जनला एक तोडीस तोड व्हर्जन एका चिमुकली ने Saxophone या वाद्यातून सादर केला आहे. पाहा व्हिडिओ

हेदेखील वाचा- Merry Christmas 2019 Wishes: नाताळ सणाच्या शुभेच्छा मराठमोळ्या ग्रीटिंग्स, SMS, Messages, GIFs, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन खास करा यंदाचा ख्रिसमस

हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला असून या तो प्रचंड व्हायरल होत आहे. शिवाय लोक या व्हिडिओला आणि त्या मुलीच्या या कलेचेही कौतुक करत आहेत. त्यामुळे ज्यांना ढोल ताशा पथकांचे कलाविष्कार आवडतो त्यांना हा व्हिडिओ नक्की आवडेल.