पंजाबचे लोकप्रिय कुल्हड पिझ्झा कपल (Kulhad Pizza Couple), सेहज अरोरा (Sehaj Arora) आणि गुरप्रीत कौर (Gurpreet Kaur) नेहमीच नेटीझन्सचे लक्ष वेधून घेतात. नुकताच त्यांचा कथीत MMS सेक्सी व्हिडिओ लीक झाल्याची चर्चा होती. ज्यामुळे हे जोडपे प्रकाशझोतात आले होते. दरम्यान, आता त्यांचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Kulhad Pizza Couple Viral Video) झाला आहे. हा व्हिडिओ सकारात्मक असून, त्यात ते गायक तरण कपूरच्या 'वे सोहनेया' या पंजाबी हिट गाण्यावर नाचताना दिसत आहेत. आगोदरच चर्चेत असलेल्या या कपलचा व्हिडिओ पुढे येताच नेटीझन्सनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर
सेहज अरोरा यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर (@sehaj_arora_) हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये कुल्हड पिझ्झा कपल (@sehaj_arora_) एका नयनरम्य ठिकाणी ट्रॅकवर जात असल्याचे दाखवले आहे. निसर्गरम्य पार्श्वभूमी आणि गाणे यावर नृत्याच्या खास पोझमध्ये आपल्या अदा दाखवणारे हे जोडपे. नेटीझन्सना भावले. जोडप्याचा हा व्हिडिओ त्यांच्या आगोदरच्या कथीत व्हिडिओच्या तुलनेत अधिक प्रभावशाली असून, त्याची चर्चाही होत आहे. (हेही वाचा, Kulhad Pizza Viral Video Couple's Romantic Reels: सहज अरोरा-गुरप्रीत कौर, इंटरनेट सेन्सेशन्स लीक झालेल्या एमएमएसनंतर पोस्ट केले सुंदर रिल)
एक्स-रेट व्हिडिओ ऑनलाइन लीक
जालंधर येथील कुल्हड पिझ्झा कपल या आधी एक्स-रेट केलेला व्हिडिओ ऑनलाइन लीक झाल्याने ऑक्टोबर 2023 मध्ये चर्चेत आले होते. हा व्हिडिओ आपला नसल्याचे आणि बनावट असल्याचे या जोडप्याने सांगितले असले तरी, अनेकांनी या जोडप्यावर प्रसिद्धीसाठी मुद्दाम क्लिप लीक केल्याचा आरोप केला. असे असूनही, जोडप्याने सामग्री सामायिक करणे सुरू ठेवले, हळूहळू ते पुन्हा एकदा ऑनलाइन सक्रीय झाले. त्यांच्या ताज्या व्हायरल क्लिपमध्ये, या जोडप्याच्या नृत्यावर सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी त्यांच्या कामगिरीची आणि सुंदर सेटिंगची प्रशंसा केली, तर काहींनी भूतकाळातील वादाचा संदर्भ देतही टिप्पणी केली. काही नेटीझन्सनी आगोदरच्या कथीत व्हिडिओमुळे व्यथीत झाले असतानाही, नव्या आत्मविश्वासने त्यांनी नवा आणि चांगला व्हिडिओ शेअर केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. (हेही वाचा, Kulhad Pizza Couple MMS Video Controversy: 'तो' वादग्रस्त व्हिडिओ AI निर्मित, कुल्हड पिझ्झा मालक सेहज अरोरा यांचा दावा; पोलिसात तक्रार)
कुल्हड कपल डान्स व्हिडिओ
View this post on Instagram
एका वापरकर्त्याने आगोदरच्या कथीत व्हिडिओचा अप्रत्यक्ष संदर्भ देत टिप्पणी केली की, "रिलॅक्स मित्रांनो, ते सीझन 2 साठी शूटिंग करत आहेत." दुसऱ्याने लिहिले, "छान डान्स आणि छान जागा. तुम्ही काही दिवस सुट्टीवर होता का? हे छान दिसत आहे!" इतर टिप्पण्यांमध्ये त्यांच्या नृत्याच्या चालींसाठी साध्या स्तुतीपासून ते त्यांच्या सतत सोशल मीडिया ॲक्टिव्हिटीबद्दल आणखीही काही टिप्पण्या आहेत. "Ve Sohneya is out now" असे कॅप्शन असलेल्या या व्हिडिओला हजारो दृश्ये आणि टिप्पण्या मिळाल्या आहेत.