सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या कुल्हड पिझ्झा कपल सेहज अरोरा आणि गुरप्रीत कौर यांचा एक अत्यंत खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरुन जोरदार वाद आणि चर्चा सुरु झाल्यानंतर सेहज अरोरा यांनी यावर भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट असून कृत्रिम बुद्धीमत्ता अर्थात एआय (AI) निर्मित आहे. त्यांनी सांगितले की, इन्स्टाग्रामवर त्यांना एक ब्लॅकमेल संदेश मिळाला होता. ज्यामध्ये जालंधरच्या ठाणे क्रमांक 4 येथे प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यास सांगण्यात आले होते.

व्हिडिओमध्ये कुल्हड पिझ्झा आस्थापनाचे मालक सेहज अरोरा आणि त्यांची जोडीदार दाखवल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, अरोरा यांनी हे आरोप ठामपणे फेटाळून लावले असून पोलिसांकडे रितसर तक्रार दाखल केली आहे.

ट्विट

ट्विट

इन्स्टा पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)