Tumkur Police Constable | (Photo Credits: X)

एका चोराला पकडण्यासाठी आपला जीव धोक्यात घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास 'वीर' म्हणून गौरविण्यात आले आहे. दोडलिंगय्या (Constable Doddalingayya) असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, ते टमकूर (Tumkur) येथील कोरटागेरे पोलीस (Kortagere Police) स्टेशनमध्ये कॉन्स्टेबल आहेत. त्यांनी बंगळुरुमधील (Bengaluru) कुख्यात गुन्हेगार मंजेश, उर्फ ​​420 मांजा, उर्फ ​​होटे मांजा याला शथापीने पकडले. चोराला पकडतानाचा या कर्मचाऱ्याचा संघर्ष सीसीटीव्ही (CCTV Footage) कॅमेऱ्यात कैद झाला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियातही व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी दोडलिंगय्या यांचे कौतुक केले आहे.

आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, बेंगळुरूमधील एका चौकातून दुचाकीवर जात असलेला आरोपी मंजेश, उर्फ ​​420 मांजा, उर्फ ​​होटे मांजा साध्या वेशात असलेल्या दोडलिंगय्या यांच्या नजरेस पडला. त्यांनी त्याला पकडले. मात्र, चकवा देण्याच्या प्रयत्नात त्याने दुचाकी तशीच पुढे दामटवली. मात्र, दोडलिंगय्या यांनी पिछा सोडला नाही. त्यांनी त्याला पकडून ठेवले. ते त्याला पकडून दुचाकीसोबत धावले. शेवटी त्यांनी त्याला एक हिसका दिला आणि दुचाकी थांबली. त्याचा फायदा घेत दोडिंगय्या यांनी मांजापाय घट्ट पकडून ठेवला. त्यांची धडपड पाहून कर्तव्यावर आणि वर्दीत असलेली एक महिला वाहतूक पोलीसही तेथे आली. तिनेही त्याला पकडून ठेवले. त्यांना पाहून इतर नागरिकही तेथे आलेआणि त्यांनी आरोपीला पकडले. (हेही वाचा, 'Driverless Car' in Pune: गाडीत चालक नसताना पुणे महानगरपालिकेचा रोड मेंटेनन्स टेम्पो रिव्हर्समध्ये सुसाट; समोर आला अंगावर काटा आणणारा व्हिडिओ (Watch))

आरोपी पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार

पोलिसांनी सांगितले की, कोरटागेरे पोलिस स्टेशनमधील कॉन्स्टेबल दोडलिंगय्या (Constable Doddalingayya) यांनी पकडलेला आरोपी हा पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर 75 पोलिस खटले प्रलंबित आहेत. आरोपी शहरातच असून, सध्या तो सदाशिव नगर पोलिस जंक्शनजवळ दुचाकीवरुन निघाला असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. मंजेश एका महिन्यापासून फरार होता आणि तुमकूर जिल्ह्यातून बेंगळुरूला पळून गेला होता.

व्हिडिओ

कॉन्स्टेबल दोडलिंगय्याचे हे धाडसी कृत्य सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी समर्पण आणि धैर्य दर्शवते. अशा अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची प्रशासनाला गरज आहे. ज्याचा फायदा समाजाला होतो, अशी भावना पोलीस प्रशासन आणि समाजातून व्यक्त होत आहे. त्यांच्या या कामगिरीबाबत सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. त्यांना वीर म्हणून संबोधण्यात आले आहे. दरम्यान, थोडी जरी चूक झाली असती तर आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला असता. इतकेच नव्हे तर हे धाडस दोडलिंगय्या यांच्या जीवावरही बेतू शकले असते. त्यामुळे त्यांच्या धाडसाचे विशेष कौतुक असल्याचे नागरिकांकडून व्यक्त होत आहे.