व्हिडिओ : 'या' चहावाल्याची हातचलाखी पाहून व्हाल चकित !
केरळमधील खास चहा. (Photo Credit : Twitter)

भारतात चहाप्रेमींची काही कमी नाही. अमृततुल्य चहा अगदी सकाळ सकाळ पिणारे अनेक आहे. तसंच या चहाप्रेमींना चहासाठी ना निमित्त लागत ना वेळ. अगदी कोणत्याही वेळी चहाचा आस्वाद घेतला जावू शकतो. चहाची ही लोकप्रियता लक्षात घेऊनच अनेक चहा टपऱ्या, चहाचे विविध प्रकार मिळणारे हॉटेल्स सुरु झाले.

अशाच एका चहावाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ केरळमधील चहावाल्याचा आहे. व्हिडिओ व्हायरल होण्याचे कारण म्हणजे या चहावाल्याची चहा सर्व्ह करण्याची पद्धत. आता तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष? पण हा व्हिडिओ पाहुन तुम्हीही या चहावाल्याच्या कौशल्याला दाद द्याल.

२ लेअरमध्ये असलेला ग्लास हा चहावाला हातात अशा पद्धतीने गोल फिरवतो की एकदम भन्नाट चहा तयार होतो. त्याची ही हात फिरवण्याची कसब पाहुन अनेकजण भारावून जातात. त्याच्या ही स्टाईल पाहुन अभिनेता रजनीकांतसोबत त्याची तुलना होत आहे.