मुसळधार पावसाळ्यात धबधब्यात भिजण्यासाठी जाण्यास स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून मज्जाव केला जातो. तरीही काही लोक जीव धोक्यात घालत तिथे जातात. अशाचप्रकारे काही तरुणही एका धबधब्याखाली भिजत होते. यावेळी तिथे अचानक पोलिसांची एंट्री झाली. यानंतर पोलिसांनी धबधब्याखाली भीजत असलेल्या तरुणांचे कपडे घेऊन निघाले आणि त्यांना असे करताना पाहून तरुणांनी पोलिसांच्या मागे येत त्यांना विनवण्या केल्या पोलिसांनी त्यांचे काही न ऐकता त्यांचे कपडे आपल्या गाडीत ठेवले. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Khujli Gang in Delhi: खुजली गँगमधील दोन जणांना अटक, दिल्ली पोलिसांनी सापळा रचून केली अटक (Watch Video))

ही घटना कर्नाटकातील चिकमंगलूर आलेखान फॉल्स चारमाडी येथील आहे. चिकमंगलूरमध्ये आकर्षक धबधबे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक तिथे येत असतात. मुडीगेरे परिसरात कोटिगे हारा ते चारमाडी घाट रोडदरम्यान असलेल्या धबधब्याजवळ जाण्यास पोलिसांनी मनाई केली आहे. तरी देखील अनेक पर्यटक या ठिकाणी आपला जीव धोक्यात घालून जात असतात. अशा पर्यटकांना पोलीस नेहमीच चांगला धडा शिकवला.

पाहा पोस्ट -

पोलिस धबधब्याजवळील लोकांचे कपडे घेऊन काही अंतर खाली उतरले, यावेळी त्यांच्या मागोमाग भिजणारे तरुण आले, त्यांनी पोलिसांकडे विनवणी करत कपडे मागण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी कोणतीही कडक कारवाई केली नसल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी तरुणांना कडक ताकीद दिली आणि शेवटी त्यांचे कपडे परत केले. भविष्यात पोलिसांनी दिलेल्या सूचनांना दुर्लक्ष करणार नसल्याचे सर्व तरुणांनी सांगितले, त्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिले.