कोरोनाची करी आणि मास्कचा नान; जोधपूर मधील हॉटेलचा हटके मेन्यू, पहा फोटो
Corona Kofta Curry Mask Naan (Photo Credits: Twitter)

देशात कोरोनाचा (Coronavirus) प्रसार सुरु झाल्यापासून अनेक प्रकारे जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यापूर्वी आपण मास्क च्या आकारात पराठा, कोरोना विषाणूच्या रूपात मिठाई, सोने, चांदी, हिऱ्याचे मास्क आणि नानाप्रकार पाहिलेच आहेत. आता त्यात जोधपूरच्या एका हॉटेलची अशीच एक क्रिएटिव्हिटी भर पाडत आहे. जोधपूरमधील Vedic multi-cuisine या रेस्टॉरंट मध्ये कोरोना करी (Corona Kofta Curry) आणि मास्कचा नान (Mask Naan) ही डिश सर्व्ह केली जात आहे. हा मलई कोफ्त्याचा एक प्रकार असून यात कोफ्ता खास कोविड विषाणूच्या आकारात बनवण्यात आला आहे. तर नानही मास्कच्या आकाराचे बनवण्यात येत आहेत. या डिशचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. Mask Shape Parottas: तमिळनाडू मध्ये कोरोना संकटकाळात 'मास्क' वापरण्याविषयी जनजागृती मदुराईच्या रेस्टारंट चालकाचा अनोखा प्रयत्न

अनलॉक 3 च्या अंतर्गत देशात कंटेनमेंट झोन व्यतिरिक्त भागात हॉटेल सुरु झाले आहेत. सर्व नियमांचं पालन करुन होम डिलीव्हरी सर्विस सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोरोनामुळे अगोदरच अनेकांच्या मनात भीती असताना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही खास डिश बनवण्यात आल्याचे हॉटेल कडून सांगण्यात आले आहे. COVID 19: 'आपण Corona ला पचवू शकतो,तो आपल्याला नाही' असे म्हणत पश्चिम बंगाल मध्ये साकारण्यात आली कोरोना च्या रूपातील मिठाई (See Photos)

कोरोनाची करी आणि मास्कचा नान

दरम्यान, हे व्हायरल होणारे फोटो सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत, कोणत्याही मोठ्या संकटकाळात सुद्धा आपण इंडियन्स क्रिएटिव्हिटी बाजूला करत नाही आणि हसतखेळत आपल्या अंदाजात सगळ्या संकटांचा सामना करतो, अशा कमेंट्स या फोटोवर दिसून येत आहेत.