ईराणच्या इतिहासामध्ये 10 ऑक्टोबर ही तारीख सोनेरी अक्षरांमध्ये लिहली जाणार आहे. काल (10 ऑक्टोबर 2019) दिवशी 'आजादी स्टेडियम' (Azadi Stadium) वर ईराणी महिलांनी सुमारे 40 वर्षांची परंपरा मोडत फूटबॉलचा सामना स्टेडियममध्ये बसून लाईव्ह पाहिला आहे. सुमारे 3500 ते 4000 महिला काल ईरान विरूद्ध कंबोडिया ही फीफा वर्ल्ड कप क्वालिफायर मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहचले होते. यावेळेस या महिलांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्याचे काही फोटो आणि व्हीडिओज सध्या सोशल मीडीयामध्ये व्हायरल होत आहेत.
मध्ये 1979 इस्लामिक रिवॉल्युशन नंतर महिलांना स्टेडियमवर जाऊन मॅच पाहण्यास बंदी होती. ईराणी कायद्यानुसार जर महिला स्टेडियमवर सामना पाहण्यास पोहचली तर तिला सहा महिन्याची शिक्षा होऊ शकते. महिन्याभरापूर्वी एक महिला वेषांतर करून सामना पहण्यासाठी पोहचली होती. तेव्हा तिला अटक झाली. यानंतर तिने आत्मदहन करून स्वतःचे जीवन संपावले. या घटनेनंतर महिलांवरील बंदी हटवण्याचा लढा तीव्र करण्यात आला होता. अखेर ईराणी महिलांना स्टेडियमवर जाऊन मॅच बघायला परवानगी देण्यात आली आहे.
आनंद व्यक्त करणार्या फूटबॉल चाह्त्या
Excitement and joy as women enter #Iran’s Azadi Stadium to watch a football match. They’ve been banned from purchasing tickets for the past 38 years and have been facing arrest and prosecution for decades to win back this right. #FIFA pic.twitter.com/d1Q4ZcSg8p
— IranHumanRights.org (@ICHRI) October 10, 2019
ईराणी महिलांनी सजलेलं आझादी स्टेडियम
काल ईराण विरूद्ध कंबोडिया या सामन्यात ईराणने 14-0 असा दणदणीत विजय मिळवला आहे. FIFA World Cup 2022 चा हा क्वालिफायर सामना होता. यावेळेस महिलांनी फीफाचे धन्यवाद मानले आहेत.