Instagram Followers गमावण्याच्या भीतीने मॉडेलने केले बॉयफ्रेंडशी ब्रेकअप, नेटकऱ्यांनी दिला पाठिंबा
Representational Image (Photo Credits: Pixabay)

इंस्टाग्रामचे (Instagram) या माध्यमाचे अनेकांच्या आयुष्यात अपार महत्व आहे म्ह्णूनच ही मंडळी आपल्या क्षणोक्षणीची अप टू डेट माहिती आपल्या फॉलोअर्स सोबत अगदी निष्ठेने शेअर करत असतात. खरंतर हा ट्रेंड सुरु झाल्यावर काही जणांनी याला शोबाजीच्या टॅग खाली दूषणे दिली होती मात्र कालांतराने हाच मंच कमाईचे साधन सुद्धा ठरला. ज्याचे अधिक फॉलोअर्स (Followers)  तोच बेस्ट इंस्टाग्रामर या न्यायाने हा प्रकार सुरु आहे त्यामुळे साहजिकच या Influencer मंडळींना आपले फॉलोअर्स कमी होण्याची भीती असते, याच भीतीपायी अमेरिकेतील एका मॉडेलने (Instagram Model) आपल्या बॉयफ्रेंड सोबत ब्रेकअप (Brakeup) केल्याची बाब समोर आली आहे. 'IGAZmodel' हे युजरनेम असलेल्या 22 वर्षीय मॉडेलचे तब्बल साडे चार लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

या मॉडेलने स्वतः आपल्या ब्रेकअप विषयी माहिती देत  Reddit वर एक पोस्ट लिहिली होती, ज्यामध्ये आपला बॉयफ्रेंड सतत एकत्र फोटो पोस्ट करत असल्याची मागणी करत होता, पण असे केल्यास आपले फॉलोअर्स कमी होतील, व परिणामी पैसे मिळणार नाहीत त्यामुळे आपण त्याला सोडून दिले असे तिने म्हंटले आहेत

काय आहे हे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी ही मॉडेल आपल्या बॉयफ्रेंड सोबत मेक्सिकोला व्हेकेशनसाठी गेली होती, तेव्हा त्यांनी तिथे फिरताना, ट्रेकिंग करताना, खाता पिता इतकंच नव्हे तर सेक्स करताना सुद्धा बरेच फोटो काढले होते, तिने यातला निदान एक फोटो तरी आपल्या इंस्टग्रामवर पोस्ट करावा अशी तिच्या कथित बॉयफ्रेंडची मागणी होती, ही गोष्ट वारंवार नाकारूनही तो सतत तिला कारण विचारत होता. ज्यावर या मॉडेलने इंस्टाग्राम हे माझे काम आहे आणि म्ह्णून त्याला आपण बाजूला ठेवुयात असे स्पष्टीकरण दिले होते, मात्र तरीही तिच्या बॉयफ्रेंडचा प्रश्नांचा ससेमिरा न थांबल्याने तिने शेवटी त्याच्याशी ब्रेकअप केले.

 हे ही वाचा -धक्कादायक! कुत्रीच्या प्रेमप्रकरणामुळे मालकाचा संताप; शेजाऱ्या कुत्र्यासोबत अनैतिक संबंध ठेवल्यामुळे घराबाहेर हाकलले

Reddit वरील पोस्ट मध्ये , याबाबत अधिक सांगताना, एखाद्या मुलासोबत फोटो पोस्ट केल्यावर फॉलोअर्स कमी होऊन तिला जाहिराती मिळणार नाहीत, त्यामुळे आपले काम हे असेच आहे असं तिने लिहिलं होतं. तसेच या व्हेकेशन मागचा मूळ हेतू हा स्वतःचे फोटो टाकून फॉलोअर्स वाढवणं असा असताना याउलट भलतंच काहीतरी घडून बसल्याने तिने खेद व्यक्त केला.

दरम्यान, तिच्या या पोस्टनंतर अनेकांनी तिला तिचा निर्णय योग्य असल्याचे सांगत पाठिंबा दिला. तसंच या मॉडेलने आपल्या कामाविषयी माहिती देऊनही तिच्या बॉयफ्रेंडने हट्ट धरला म्हणून त्याच्यावर सुद्धा टीका होत आहे. या दोघांमध्ये या एकूण घटनेननंतर काहीच संभाषण झाले नसल्याचे या मॉडेलने सांगतले आहे.