जर तुमच्या मध्ये काही करण्याची, काही बनण्याची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात येणा-या प्रत्येक संकटावर मात करून तुमचे मोठं बनण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. त्यासाठी केवळ एकच गोष्ट महत्त्वाची आहे माणसाने कधीच हिंमत हरली नाही पाहिजे. हिंमतीच्या जोरावरच तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करु शकता. त्यासाठी ती हिंमत कधी कमी होऊ देऊ नका. याचे एक जिवंत उदाहरण म्हणजे सब इन्स्पेक्टर बनलेली पद्मशीला तिरपुडे (Padmshila Tirpude). सब इन्स्पेक्टर बनण्यापूर्वी दगडाचे खलबत्ते बनवायच्या. मात्र आज आपल्या मेहनतीच्या, हिंमतीच्या जोरावर त्या सब इन्स्पेक्टर पदावर कार्यरत आहेत. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या फोटोवर IPS अधिकारी दीपांशू काबरा यांनी पद्मशीला यांचा फोटो एक जुना फोटो शेअर केला आहे.
दीपांशु काबरा यांनी पद्मशीला यांचा फोटो शेअर करत कोणतीही परिस्थिती तुमची उडाण रोखू शकत नाही असे कॅप्शन या फोटोखाली लिहिले आहे. ही कहाणी आहे महाराष्ट्रातील भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील पद्मशीला तिरपुडे यांची. दीपांशू यांनी म्हटले आहे की, 'नशीब जरी तुमच्या डोक्यावर जड दगड ठेवले तरी यशाचा पुल कसा बनवायचा हे भंडा-याच्या पद्मशीला तिरपुडे यांच्याकडून शिका.' Viral Video: 'बाबा का ढाबा' नंतर आता फरीदाबादमधील भेलपुरी विकणाऱ्या 86 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा भावनिक व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडिया युजर्सने केली 57 हजार रुपयांची मदत
परिस्थितियाँ आपकी उड़ान नहीं रोक सकती.
किस्मत भले आपके माथे पर भारी पत्थर रखे लेकिन उनसे कामयाबी का पुल कैसे बनाना है ये भंडारा, महाराष्ट्र की #पद्मशीला_तिरपुडे से सीखें. पत्थर के सिलबट्टे बनाकर बेचने वाली पद्मशीला ने मेहनत की और MPAC में उत्तीर्ण होकर पुलिस उपनिरीक्षक बनीं pic.twitter.com/TjIUMBSkjH
— Dipanshu Kabra (@ipskabra) October 22, 2020
आपल्या मेहनतीच्या जोरावर MPAC चे उत्तीर्ण होऊन त्या पोलिस उपनिरीक्षक बनल्या आहेत. त्यांच्या या संघर्षात त्यांच्या पतीने त्यांना चांगली साथ दिली असेही त्यांनी म्हटले आहे.
दीपांशू काबरा यांनी पुढे लिहिले आहे की, सुरुवातीच्या दिवसात पद्मशीला आपल्या पतीसोबत मजूरी करायच्या. आर्थिक अडचण असतानाही त्यांच्या पतीने ठरवले की आपल्या पत्नीला मोठे बनवायचे त्यांचे शिक्षण पूर्ण करायचे. खलबत्ते आणि फळ विकून पद्मशीला आपले शिक्षण पूर्ण केले आणि MPAC परीक्षा उत्तीर्ण झाल्या. सोशल मिडियावर पद्मशीला तिरपुडे यांच्या या कष्टाचे सर्व लोक कौतुक करत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.