Viral Video: 'बाबा का ढाबा' नंतर आता फरीदाबादमधील भेलपुरी विकणाऱ्या 86 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा भावनिक व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडिया युजर्सने केली 57 हजार रुपयांची मदत
फरीदाबादमध्ये भेलपुरी विकणारे बाबा (Photo Credits: thegreatindianfoodie Instagram)

Viral Video: लॉकडाउनमधून (Lockdown) बाबा का ढाबा (Baba Ka Dhaba) चालवणाऱ्या वयोवृद्ध जोडप्यास व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर या जोडप्याला नेटकऱ्यांनी आर्थिक मदत देऊ केली होती. त्यावेळी सोशल मीडियाची अद्भुत शक्ती पाहायला मिळाली होती. सध्या सोशल मीडियावर फरीदाबादमध्ये भेलपुरी विकणार्‍या 86 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा भावनिक व्हिडिओ व्हायरल होत आहे. कोविड -19 च्या उद्रेकामुळे (COVID-19 Outbreak) फरीदाबादमध्ये (Faridabad) भेलपुरी (Bhelpuri) विकणाऱ्या चंगा बाबा नावाच्या या वृद्ध व्यक्तीचा रोजगार बंद झाला. भेळपुरीची विक्री न झाल्याने त्यांना दोन वेळेची भाकरी बनवणंदेखील कठीण जात होतं. एका इंटरनेट वापरकर्त्याने बाबांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ते सांगत आहेत की, आपल्याला कुटुंबाची काळजी घ्यावी लागते. हा भावनिक व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटीझन्सनी या बाबांना आर्थिक मदत केली आहे. हा व्हिडिओ फरीदाबादमधील सेक्टर 37 मधील सामुदायिक केंद्रासमोर घेण्यात आला होता.

द ग्रेट इंडियन फूडी (The Great Indian Foodie) या इंस्टाग्राम हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये या यूजरने बाबाजींना 57 हजार रुपये दिले आहेत. हे पैसे वेगवेगळ्या व्यक्तींनी त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दिले आहेत. जे लॉकडाऊनमुळे कठीण परिस्थितीतून जात आहेत. अर्धांगवायू झालेल्या मुलाबरोबर चंगा बाबा राहत आहेत. पाच वर्षांपूर्वी त्यांनी आपली पत्नी गमावली आणि त्यांचा धाकटा मुलगाही मरण पावला, असे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आल आहे. बाबांना केवळ त्यांची सून मदत करते. ती लोकांच्या घरात काम करते आणि तिला तीन मुले आहेत. संपूर्ण कुटुंबाचे उत्पन्न 6 हजार रुपये आहे. परंतु कोरोना साथीमुळे त्याचे संपूर्ण आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे. (हेही वाचा - दिल्ली: बाबांच्या भावूक व्हिडिओनंतर 'Baba Ka Dhaba' ला नेटकऱ्यांकडून उदंड प्रतिसाद; पहा फोटोज आणि व्हिडिओज)

युजर्सने बाबांना केली 57 हजार रुपयांची मदत -  

या युजर्सने बाबाजीकडे पैसे देताचं त्यांनी हे पैसे मुलांची फी भरण्यास उपयोगात येतील असं म्हटलं आहे. या आर्थिक मदतीनंतर बाबाजींनी या युजर्सचे आभार मानत आशीर्वाद दिला आहे. तथापि, काही लोक बाबाजीच्या या परिस्थितीचा फायदा घेत असून बाबांच्या नावावर लोकांकडून पैशाची मागणी करुन ते स्वतःसाठी वापरत आहेत.