Indore Viral Girl: इंदूरमधील प्रसिद्ध चाट-चौपाटीवर छोट्या कपड्यांमध्ये फिरणाऱ्या तरुणीने अश्लील कृत्य केल्या प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी तरुणीविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. इंदूर येथील पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. तुकोगंज पोलिस स्टेशनचे प्रभारी जितेंद्र सिंह यादव यांनी सांगितले की, 56 दुकान समोर नुकतीच अश्लील कपड्यांमध्ये फिरताना दिसलेल्या मुलीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 296 (सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवणे) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. काही स्थानिक महिला संघटना तसेच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनांनी मुलीच्या या कृत्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यादव म्हणाले, “आम्ही या संघटनांच्या लोकांचे जबाबही नोंदवले आहेत.
तरुणीने छोट्या कपड्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी फिरल्याने अश्लीलता पसरली, ज्यामुळे त्याच्या मनात राग निर्माण झाला.'' शहरातील 56 दुकानांसोबतच मेघदूत चाट-चौपाटीवरही ही मुलगी छोट्या कपड्यांमध्ये फिरताना दिसली. त्याचा व्हिडिओ तिने स्वतः सोशल मीडियावर “पब्लिक रिॲक्शन” या शीर्षकाने पोस्ट केला आहे.
व्हिडिओ वेगाने पसरल्यानंतर सत्ताधारी भारतीय जनता पक्ष, बजरंग दल आणि इतर संघटनांच्या नेत्यांनी पोलिसांकडे तरुणीवर कारवाईची मागणी केली. वाद वाढत गेल्याने तरुणीने माफी मागितली आणि तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हे व्हिडिओ काढून टाकले. भारतीय तरुणीने सोशल मीडियावर दावा केला होता की, ती संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई शहरात राहते.