टेस्ला चालक कारमध्ये झोपताना (फोटो क्रेडिट्स: ट्विटर)

Tesla Driver and Passenger Caught Sleeping in Moving Vehicle: टेस्ला कार ऑटोपायलट फिचर्सचा दावा करते, म्हणजेचं ही कार चालकाशिवाय रस्त्यावर चालू शकते. त्यामुळे टेस्ला कार चालविताना ड्रायव्हरला जास्त सावध असण्याची गरज नसते. सध्या सोशल मीडियावर टेस्ला कारचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या कारमध्ये चालक आणि प्रवासी दोघेही ऑटोपायलट टेस्ला कारमध्ये झोपलेले पाहायला मिळत आहेत. हे दृश्य चालकांना नक्कीच आरामदायक वाटत असले तरी ते पाहणाऱ्यांसाठी खूपच धडकी भरवणारे आहे. हा व्हिडिओ कोठून घेण्यात आला हे माहित नाही. मात्र, ट्विटरवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओला लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अलीकडेचं टेस्लाने भारतीय बाजारपेठेत प्रवेश केल्यावर काही लोकांना प्रश्न पडला आहे की, हे फिचर्स भारतात कार्य करतील का आणि याचे परिणाम काय होतील? गेल्या वर्षी टेस्ला ऑटोपायलट चालक चित्रपट पाहण्यात व्यस्त असतानाच उत्तर कॅरोलिनामधील डेप्यु शेरिफच्या कारला अपघात झाला.

टेस्ला कारचे ऑटोपायलट वैशिष्ट्य सर्वात चर्चेत आहे. त्यांच्यामार्फत देण्यात आलेल्या प्रगत ड्रायव्हर-सहाय्य प्रणाली सुविधांमध्ये लेन सेंटरिंग, ट्रॅफिक-जागरूक क्रूज कंट्रोल, सेल्फ-पार्किंग, ऑटोमॅटिक लेन, लिमिटेड एक्सेस फ्रीवेवर सेमीऑटोनॉमस नेविगेशन, आदी फिचर्स आहेत. ही कार स्वतः पार्किंग देखील करू शकते. परंतु, यानंतरही कारसाठी ड्रायव्हर जबाबदार आहे. एक 20 सेकंदाची व्हिडिओ क्लिप ट्विटर अकाऊंट @knowIedgehub वर ऑनलाइन शेअर करण्यात आली आहे. हा व्हिडिओ कोठून घेतला याची माहिती नाही. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, टेस्ला कारचा चालक आणि प्रवासी दोघेही चालत्या कारमध्ये झोपले आहेत आणि कार रस्त्यावर धावत आहे. लोक या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. (वाचा - Viral Video: हत्ती आणि कुत्र्याची ही घट्ट मैत्री पाहून 'शोले' चित्रपटातील गाण्याची येईल आठवण, पाहा मजेशीर व्हिडिओ)

पहा व्हिडिओ -

हा व्हिडिओ एक लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओला जवळपास 1000 रिट्वीट प्राप्त झाले आहेत. हा व्हिडिओ पाहून लोक अस्वस्थ झाले आहेत. यातील काही यूजर्संनी या व्हिडिओवर दिलेल्या प्रतिक्रिया पहा.

बेजबाबदार - 

खतरनाक -

अमेरिकेची दिग्गज इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्ला येत्या काळात स्वयंचलित कार बनविण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याच्या प्रयत्न करत आहे. टेस्लाच्या कारमध्ये अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत, जी भविष्यात उपयोगी ठरू शकतात. सध्या टेस्लाने ऑटोपायलट फिचर्स असणाऱ्या कार बाजारात आणल्या आहेत. ग्राहक या कारला पसंती दर्शवत आहेत.