लज्जास्पद! पॉर्न वेबसाइटवर लोक सर्च करत आहेत हैदराबाद सामूहिक बलात्कार पीडितेचा व्हिडिओ
Victim | (Images for symbolic purposes only । Photo Credits: pixabay)

हैदराबाद (Hyderabad) येथे एका महिला वेटरनरी डॉक्टरवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्यावर तिची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर देशभरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून, हे कृत्य करणाऱ्या नराधमांना कडक शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे. देशभरात आवाज उटत असतानाच मानवता किती रसातळाला जाऊ लागली आहे याचेही एक धक्कादायक उदाहरण या घटनेनंतर पुढे येऊ पाहात आहे. इंटरनेट यूजर्स (Internet Users) असलेल्या लोकांपैकी अनेक लोक आता या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर उपलब्द असलेल्या पॉर्न वेबसाईट्सवर शोधू लागले आहेत. पीडितेच्या व्हिडिओचा गुगल सर्च होत असल्याने धक्का बसलेल्या अनेक लोकांनी याबाबतचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत.

दरम्यान, अनेक लोकांनी मागणी केली आहे की, या घटनेतील पीडितेच्या नावाने मिळणारा इंटरनेटवरील सर्च रिजल्ट (Search Result) हटविण्यात यावा. अभ्यासकांनी दावा केला आहे की, पॉर्न वेबसाईट्सवर अनेक लोक या घटनेचा व्हिडिओ सर्च करत आहेत. परंतू, अनेकांनी या घटनेचा कीवर्ड वापरत अनेक फेक व्हिडिओही अपलोड केले आहेत. त्यामुळे ही घटना आणि व्हिडिओ अश्लिल साइट्सवर टॉप ट्रेंडमध्ये आहेत.

रशियातील एक वेबसाईट 'रशिया टुडे' च्या हवाल्याने न्यूज 18 हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, एक मोठी पॉर्न वेबसाईट वर भारतीय (Indian) आणि पाकिस्तानी (Pakistan) वर्जनवर हैदराबाद सामूहिक बलात्कार (Hyderabad Gang Rape Victim) पीडितेचे नाव टॉप ट्रेण्ड (Top Trend) होत आहे. (हेही वाचा, Hyderabad Rape And Murder Case: सौदी अरेबिया, चीन यांसारख्या या '10' देशांमध्ये अशा पद्धतीने दिली जाते बलात्कारी व्यक्तीस शिक्षा)

दरम्यान, इंटरनेटवर कार्यरत असलेल्या असंख्य भारतीयांनी या वेबसाईट्सवरुन पीडित युवतीचे नाव हटविण्यात यावी अशी मागणी केली आहे. ट्विटरवर काही युजर्सनी दावा केला आहे की, केवळ 48 तासांमध्ये या साइट्सवर या नावाने तब्बल 8 मीलियन सर्च मिळाला आहे. पण, या दाव्यात फार तथ्य नसून आलेल्या सर्चबाबत केवळ अशा साईट्स चालवत असलेले लोकच माहिती देऊ शकतात.

Search Result | (Images for symbolic purposes only । Photo Credits:Screenshot/ twitter)

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एका बड्या पॉर्न वेबसाइटवर फेक व्हिडिओ अपलोड (Fake Video Upload) करणाऱ्या लोकांनी हैदराबाद यथील पीडित तरुणीच्या नावाने अनेक फेक व्हिडिओ अपलोड केले आहेत. तसेच काही लोकही पॉर्न वेबसाईटवर त्या विशिष्ट किवर्डचा वापर करत सर्च केला. त्यामुळे हा किवर्ड टॉप ट्रेण्ड करत आहे. मात्र, या प्रकारामुळे भारतीय लोक आणि मानवतेला मात्र लज्जास्पद स्थितीचा सामना करावा लागत आहे.