Valentine Agreement Between Husband and Wife (फोटो सौजन्य - X/@gharkekalesh)

Valentine Agreement Between Husband and Wife: आज जगभरात व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day) साजरा केला जात आहे. या प्रेमाच्या आठवड्यात, अनेक जोडपे एकत्र आली असतील, किंवा काहीजणांचं नातं जुळलेही नसेल. दरम्यान, सोशल मीडियावर एका विवाहित जोडप्याने केलेल्या पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. या पोस्टमध्ये या जोडप्यामधील संघर्ष संपूर्ण जगासमोर आला आहे. या प्रेमी जोडप्याचे व्हॅलेंटाईन करार पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या करारात, 'घराच्या नियमां'अंतर्गत जोडप्याने घरात एकमेकांवर कोणते निर्बंध लादले आहेत हे लिहिलेले आहे.

पती-पत्नीमधील व्हॅलेंटाईन करार -

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये, शुभम आणि अनया या विवाहित जोडप्याच्या अटी आणि शर्ती या 500 रुपयांच्या नोटरी पेपरवर लिहिलेल्या आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'पती-पत्नीमधील व्हॅलेंटाईन करार'. या करारात काय लिहिले आहे ते जाणून घेऊयात. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने, शुभम (पार्टी 1) आणि अनया (पार्टी 2) दोन्ही पक्षांसाठी काही घरातील नियम सांगतील जेणेकरून वारंवार होणारे वाद टाळता येतील आणि त्यांच्या व्यवसायातील व्यस्त वेळापत्रकामुळे बराच काळ बिघडलेले वैवाहिक जीवनातील प्रेम पुन्हा जागृत होईल, असं या करारात सुरुवातीला नमूद करण्यात आलं आहे. (हेही वाचा - Happy Valentine's Day 2025 HD Images: व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी WhatsApp Status, Messages द्वारा शुभेच्छा देत साजरा करा प्रेमाचा दिवस!)

ही पोस्ट शेअर करणाऱ्या वापरकर्त्याने कराराचा फोटो ऑनलाइन शेअर केला असून लिहिले आहे की, 'मला कोणीही सांगितले नाही की लग्न इतके कठीण आहे, आमच्या लग्नाच्या 2 वर्षांनंतर, माझ्या पत्नीने मला या 'विवाह करारावर' स्वाक्षरी करण्यास सांगितले, काय करावे मित्रांनो?' या करारात झोपण्यापासून ते खाण्यापर्यंतचे नियम आहेत आणि जो कोणी हे नियम मोडेल त्याला शिक्षा म्हणून तीन महिने कपडे धुवावे लागतील, शौचालय स्वच्छ करावे लागेल, घरातील सर्व किराणा सामानाची व्यवस्था करावी लागेल.

पती-पत्नीमधील व्हॅलेंटाईन करार - 

दरम्यान, पती-पत्नीच्या व्हॅलेंटाईन डे करारावर प्रतिक्रिया देताना एका वापरकर्त्याने लिहिले, 'हे महाकाव्य आहे. मला अशा प्रकारचे मजेशीर भांडणे खूप आवडतात.' दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिलं आहे की, 'हा खूप मजेदार संघर्ष आहे.' तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, 'हे खूप प्रेमळ आणि प्रभावी आहे, ते त्यांच्या नात्यावर काम करत आहेत हे दर्शवते.' तथापी, करारात पतीची सही गहाळ पाहून एका वापरकर्त्याने लिहिले की, 'शुभमने करारावर सही केलेली नाही, यावरून असे दिसून येते की त्याच्यासाठी त्याच्या पत्नीपेक्षा व्यापार जास्त महत्त्वाचा आहे.'