बदलत्या तंत्रज्ञानाचा देशाला जितका फायदा झाला तितके नुकसान देखील होत आहे. तुमचे आर्थिक व्यवहार अधिक सुलभ करण्यासाठी बँकेची आलेली ATM सुविधा जितकी फायदेशीर ठरत आहे तितकीच भीतीदायक.. कारण ATM मशीन चोरी होणे, त्यातील पैसे चोरी करणे अशा अनेक घटना दिवसागणिक ऐकायला मिळत आहे. त्यात तुमच ATM पासवर्ड देखील ब्लॉक होण्याच्या घटना घडतात. अशा वेळी दक्ष नागरिक म्हणून आपण योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. यासाठी पोलिस निरीक्षक अशोक कदम यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ATM मधून पैसे काढताना तेथील कॅमे-यातून कशी माहिती मिळते याचे प्रात्यक्षिक ते दाखवत आहे.
ATM मधून कशा प्रकारे कार्डची माहिती व पिनची माहिती कॅमे-याद्वारे मिळवून पैसे चोरी केले जातात याची माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्यात आली आहे. हेदेखील वाचा- ATM मध्ये पैसे अडकल्यास घाबरु नका; 'या' पद्धतीने मिळवा पैसे परत
पाहा व्हिडिओ
ATM मधून कश्या प्रकारे कार्ड ची माहिती व ATM च्या पिन ची कैमेराने माहिती मिळून ATM मधील पैसे काडले जातात ATM कार्डची व पैशाची आशा प्रकारे चोरी होऊ नये या करता हा विडियो बगा व दक्षता घ्यावी धन्यवाद पो.नि.अशोक कदमसाहेब@PuneCityPolice @Krishnapips @abpmajhatv @DGPMaharashtra pic.twitter.com/KpbqgfNd1n
— Wrestler ACP Vijay nathu Chaudhary (@wrestlervijay) November 23, 2020
तुमची अशा पद्धतीने फसवणूक होऊ नये म्हणून ATM मशीनमधून पैसे काढताना काय काळजी घ्यावी याची माहिती पोलिस निरीक्षकांनी उत्तमरित्या सांगितली आहे. आपल्या ATM कार्डचा पिन कसा स्कॅन केला जातो, त्यामुळे कशा पद्धतीने पैसे काढावे आणि पैसे काढून निघताना काय काळजी घ्यावी याची माहिती या व्हिडिओमधून दिली आहे.
त्याचबरोबर आपण ATM मशीन द्वारा तुम्ही बँकेत न जाता ATM पिन रिसेट करु शकता. त्यामुळे जेव्हा तुम्ही हा पिन रिसेट करत असाल तेव्हा देखील तुम्ही विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.