Horse Travelling in a Local Train: रेल्वेत प्रवाशांसोबत घोड्यानेही केला प्रवास; फोटो व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने दिले  चौकशीचे आदेश
Horse Travelling in a Local Train (PC - Facebook)

Horse Travelling in a Local Train: भारतीय लोकल रेल्वेतील एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांसोबतचं घोडादेखील दिसत आहे. ट्रेनमधील हा घोड्याचा फोटो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. हे फोटो पश्चिम बंगालमधील लोकल ट्रेनमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. पश्चिम बंगालमधील लोकल ट्रेनमध्ये घोड्याचा प्रवास करतानाचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रेनमध्ये घोड्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने चौकशीचे आदेश दिले आहेत. भारतीय रेल्वेने अद्याप या चित्राच्या सत्यतेची पुष्टी केलेली नाही. सियालदह-डायमंड हार्बर डाऊन लोकल ट्रेनमध्ये गुरुवारी ही विचित्र घटना घडली. रिपोर्टनुसार, हा घोडा दक्षिण 24 परगणा येथून रेस स्पर्धेनंतर परतत होता. (हेही वाचा - Viral Video: नवविवाहित दाम्पत्याला लग्नात दिली पेट्रोल-डिझेल ची बॉटल भेट; मित्रांनी दिलेलं गिफ्ट पाहून वधू-वरांना बसला धक्का; पहा मजेशीर व्हिडिओ)

रेल्वेतील प्रवाशांमध्ये घोडा उभा असल्याचे चित्रात स्पष्टपणे दिसत आहे. लोकल ट्रेनमध्ये घोड्याचा प्रवास करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घोड्याचा मालकही त्याच्यासोबत ट्रेनमध्ये होता. पश्चिम बंगालमधील गाड्यांमध्ये लहान गुरांसोबत प्रवास करणे सामान्य आहे, असे म्हटले जाते. लोक अनेकदा लहान प्राण्यांसोबत प्रवास करताना दिसतात. पण मोठा घोडा घेऊन ट्रेनमध्ये प्रवास करणे याआधी क्वचितच लोकांनी पाहिले असेल.

दरम्यान, हा घोडा दक्षिण 24 परगणामधील बारीपूर येथे एका अश्वारोहण कार्यक्रमातून परतत होता. तेथे उपस्थित असलेल्या इतर प्रवाशांनीही ट्रेनमध्ये घोडा आणण्यास आक्षेप घेतला होता. मात्र, घोड्याच्या मालकाने त्याकडे दुर्लक्ष केले. ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असून लोकांना पाय ठेवण्यासाठी योग्य जागा मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पूर्व रेल्वेच्या प्रवक्त्याला व्हायरल झालेल्या फोटोची माहिती होती. परंतु, ते प्रत्यक्षात घडले की नाही याचा निष्कर्ष काढता आलेला नाही. ही घटना कोणत्या स्टेशनवर घडली हे अद्याप समजू शकलेले नाही. या संदर्भात चौकशी सुरू आहे.