Horrible Accident In Madhya Pradesh: खेडा फाटक येथील अंगावर काटा उभा करणाऱ्या अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Watch Video)
मध्य प्रदेशात अपघात (Photo Credits-Twitter)

Horrible Accident In Madhya Pradesh: मध्य प्रदेशात कोरोना व्हायरसच्या दरम्यान रस्ते अपघात थांबण्याचे नाव घेत नाही आहे. याच परिस्थितीत मध्य प्रदेशातील एक धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल हे नक्कीच. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, खेडा फाटक येथे एका विचित्र पद्धतीचा अपघात घडला आहे. रेल्वे फाटक बंद असल्याच्या कारणास्तव काही वाहन चालक उभे होते. त्यामध्येच एका बाईकस्वाराच्या पाठी महिला सुद्धा बसली होती. त्यावेळी पाठून आलेल्या ट्रकचा वेग ऐवढा जबरदस्त होता की महिलेला त्याची धडक लागून ती उडाली. या व्यतिरिक्त ट्रकने कारला सुद्धा धडक देत अगदी पुढपर्यंत जाऊन पोहचल्याचे सुद्धा व्हिडिओत दिसून आले आहे.

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओत, पाठून आलेल्या ट्रकने एका बाईकस्वाराला जोरदार धडक दिल्याने महिला त्यात दगावली गेली. तसेच ट्रकची धडक बसताच ती महिला ट्रकच्या बोनेटवर येऊन पडली. या घटनेतील काही लोकांनी पाठून वेगाने आलेला ट्रक पाहता आपले वाहन सोडून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु महिला मात्र दगावली गेली आहे.(Chhattisgarh Road Accident: छत्तीसगडमधील रायपूर येथे मजूरांची वाहतूक करणाऱ्या बसला अपघात; 7 जणांचा मृत्यू)

Tweet:

दरम्यान, मध्यप्रदेशात सध्याच्या दिवसात रस्ते अपघाताच्या घटना घडत असल्याचे समोर येत आहे. अशा अपघतांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी. त्याचसोबत वाहन चालकांनी सुद्धा नियमांचे सुद्धा पालन करावे. ऐवढेच नाही तर सरकार आणि प्रशासनाकडून अशा दुर्घटनांवर लगाम लावण्यासाठी काही योजना सुद्धा लागू करत जागृकता निर्माण करत आहे. परंतु तरी सुद्धा लोकांकडून निष्काळजीपणा करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा भयंकर आणि धक्कादायक दुर्घटनांना बळी पडतात.