Happy Valentine’s Day म्हणत मुंबई पोलिस खात्याने व्यक्त केलं त्यांचं 'आगळंवेगळं' प्रेम (Video)
Mumbai Police (Photo Credits: Twitter)

Valentine’s Day 2019: केवळ गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड या प्रेमामध्ये न अडकता व्हेलेंटाईन डे (Valentine’s Day) चं औचित्य साधत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आज चक्क ते कोणावर प्रेम करतात याची कबुली दिली आहे. पोलिस आणि प्रेम या दोन टोकाच्या स्वभावाचं समीकरण आहे पण यंदा व्हेलेंटाईन डे दिवशी याची सांगडत घालत मुंबईतील कोणत्या गोष्टीवर पोलिस प्रेम करतात याची कबुली पोलिस खात्यातील काही मंडळींनी दिली आहे. ट्विटरच्या माध्यमातून एक खास व्हिडिओ पोलिसांकडून शेअर करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांचं व्हेलेंटाईन डे स्पेशल ट्विट

मुंबई पोलिस खात्यामध्ये काम करणार्‍या काही निवडक मंडळींनी मुंबईतील कोणती गोष्ट आवडते याची कबुली दिली आहे. ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये चक्क शिवाजी पार्क, मरीन ड्राईव्हपासून पाणीपुरी पर्यंत असलेलं मुंबई पोलिस कर्मचार्‍यांचं प्रेम व्हिडिओमधून शेअर केलं आहे.

मुंबईच्या रक्षणासाठी चोवीस तास कामावर असणारे मुंबई पोलिस आज व्हेलेंटाईन डे दिवशी त्याच्या मुंबईप्रेमामुळे हटके अंदाजात दिसले. आज व्हेलेंटाईन डे दिवशी उजव्या विचारसरणीच्या काही संघटनांकडून व्हेलेंटाईन डेला होणारा विरोध पाहता पोलिस विशेष गस्त घालत आहेत.