कोरोना व्हायरस सारख्या महाभयाण विषाणूने संपू्र्ण देशभरात हाहाकार माजवला असून आपल्या देशवासियांच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे देशभरात बरीच दुकाने, सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याचबरोबर खवय्यांची चांगलीच परवड झाली आहे. Social Distancing मुळे ना लोकांना घराबाहेर पडता येत आहे ना अशा सेवा पुरविणा-यांना विक्रेत्यांना आपल्या वस्तू, पदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचवता येत आहे. म्हणून गुजरातमधील (Gujrat) एका पानमसाला विक्रेत्याने एक वेगळीच शक्कल लढविली. हा व्हिडिओ TikTok वर व्हायरल झाला होता.
या व्हिडिओमध्ये गुजरात मधील मोरबी (Morbi) भागात या विक्रेत्याने ड्रोनच्या साहाय्याने पान मसाला पोहोचवत असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी हा व्हायरल व्हिडिओ पाहून संशयिताला अटक केली आहे. मुंबई: वाईन शॉप मधून 182 दारूच्या बाटल्या पळवल्या; तर मालाड येथे गावठी दारूविक्रीचे प्रकरण उघड
पाहा व्हिडिओ:
या व्हिडिओमध्ये ड्रोनच्या साहाय्याने पान मसाला पाठविण्यात आला होता. ज्यात एक माणूस आपल्या घरच्या टेरेसवरून हे कलेक्ट करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओखाली गुजराती माणूस पान खाण्यासाठी काहीही करु शकतो हे पुन्हा एकदा दाखवून दिले असे लिहिले आहे. लॉकडाऊनच्या काळात पान, गुटखा, तंबाखू यांवर बंदी घालण्यात आली असूनही अशा पद्धतीने पान मसाल्याचे उत्पादन सुरु आहे हे पाहून पोलिसांनी या इसमाचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत.