गुजरात(Gujrat) मधील गावात लग्नासंबंधित एक पारंपरिक प्रथा आहे. ही प्रथा अजूनही सामाजाकडून जपली जात असून लग्नसोहळ्याच्या वेळी नवरदेवाला त्याच्याच लग्नात जायची परवानगी नसते. या दिवशी चक्क नवरदेव घरात बसून राहतो. तर त्याची बहीण ही लग्नामधील सर्व विधी होणाऱ्या नववधूसोबत पूर्ण करताना दिसून येते. मात्र नवरदेवाला परवानगी नसली तरीही त्याला लग्नाच्या कपड्यांमध्ये सजवले जाते. परंतु नववधू घरी येईपर्यंत त्याला घरातच रहावे लागते अशी ही परंपरा अजूनही या गावात प्रचलित आहे.
सुरखेडा गावात ही प्रथा अजूनही सुरु असून येथे लग्नाच्या सर्व विधी नवरीसोबत चक्क नवऱ्यामुलाची बहिण पूर्ण करते. तसेच ही परंपरा पाळली नाही तर अशुभ घटना घडते असे मानले जाते. यासंबंधित गावातील सरपंचांसोबत या प्रथेबद्दल विचारल्यास त्यांनी सुद्धा ही प्रथा न पाळल्याचा प्रयत्न केला. परंतु ज्या वेळी असे केले त्यावेळी त्यांना अशुभ घटनांचा समोरे जावे लागले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.(धक्कादायक! मुलाच्या जन्मानंतर हॉस्पिटलमधून घरी परत येताना टॅक्सीमध्येच विसरले बाळ; पालकांचा हलगर्जीपणा)
Groom's sister marries the bride- Gujarat villagers uphold old tribal tradition
Read @ANI Story | https://t.co/FTkDz8osRA pic.twitter.com/1JfeIXH4Ky
— ANI Digital (@ani_digital) May 26, 2019
गावात असलेली ही परंपरा आदिवासी संस्कृतीचा भाग मानला जातो. त्याचसोबत लोककथेचा हा एक भाग असून शेकडो वर्षापासून ही परंपरा येथे सुरु आहे. तर सुरखेडा, सानदा आणि अंबल या तीन गावांच्या ग्रामदेवता या अविवाहित आहेत. त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ लग्नामधील नवरदेवाला घरीच थांबवले जाते. तर नवऱ्यामुलाची बहीण नवरीमुलीला घरी घेऊन येते. त्यामुळे असे केल्याने नवरदेव सुरक्षित राहतो असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.