नृत्य ही एक कला आहे. जी प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. पण, प्रत्येकाला जमतेच असे नाही. नृत्याचेही प्रकार अनेक. त्यात पोल डान्स हा एक वेगळाच प्रकार. एक अवघड असा नृत्याविष्कार. पोल डान्सवर बऱ्याचदा टीकाही केली जाते. तो करण्यासाठी मात्र प्रचंड कसब लागते. इथे तुम्हाला एक व्हिडिओ पहायला मिळेल. व्हिडिओत एक तरुणी पोल डान्स करते आहे. हा डान्स पाहून तुमी नक्कीच म्हणाल वा..!
हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहाल तर, तरुणी पोल डान्स करताना अत्यंत साध्या-सोप्या स्टेप्स करताना दिसेल. पण, तुम्ही जर या स्टेप्स कराल तर, त्यातील आव्हान तुमच्या ध्यानात येईल. पोल डान्स करतान ही तरुणी आपल्या शरीराची अशी काही हालचाल करत आहे की, बस्स. पाहताना वाटते की हे मानवी शरीर आहे की, रबराचा गोळा.
आपणही हा व्हिडिओ पाहू शकता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.