Goat swallowed by 12-foot python (PC - X/@susantananda3)

Python Swallows Goat In Berhampur: ओडिशा (Odisha) तील वन अधिकाऱ्यांनी एका मोठ्या अजगरा (Python) ची सुटका केली आहे. IFS अधिकारी सुसंता नंदा यांनी X वर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. 12 फूट लांब अजगराने एका शेळी (Goat) ला गिळले. ऑनलाइन शेअर केलेल्या दोन व्हिडिओंपैकी एका व्हिलामध्ये घुसलेल्या अजगराची सुखरूप सुटका करण्यात आल्याचं दिसत आहे. नंदा यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करताना सांगितले की, या अजगराला खल्लीकोट रेंजच्या जंगलात सोडणात आले.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दोन व्यक्ती अजगराला कपड्यात घेऊन जात आहे. त्यानंतर ते या अजगराला जंगलात सोडतात. दरम्यान, नंदा यांनी X वर आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अजगराने शेळी गिळल्यानंतर तो झुडपांमध्ये रेंगाळताना दिसत आहे. (हेही वाचा -Woman Found Dead Inside Python: अजगराने गिळली महिला, चप्पलमुळे खुलासा, पतीला धक्का; इंडोनेशियातील घटना)

दुसऱ्या व्हिडिओमध्ये अजगर जंगलातील झुडपात जात असल्याचेही दिसत आहे. या फुटेजमध्ये त्याने बकरी गिळल्याचे स्पष्टपणे दिसत आहे, त्यामुळे त्याच्या शरीराचा एक भाग जास्त फुगलेला दिसत आहे. X वापरकर्त्यांना अजगराचा हा बचाव व्हिडिओ खूपच भयानक वाटत आहे. वापरकर्ते या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत. (Python Swallows Woman in Indonesia: इंडोनेशियामध्ये 16 फुट महाकाय अजगराने महिलेला पूर्णपणे गिळंकृत केले; पोटात आढळला मृतदेह)

IFS अधिकारी नंदा यांनी X वर 2 व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं आहे की, '12 फुटांपेक्षा जास्त लांबीच्या एका विशाल अजगराची बकरीला गिळल्यानंतर एका व्हिलामधून सुटका करण्यात आली. अजगराला बहरामपूर विभागाच्या कालिकत रेंजच्या जंगलात सोडण्यात आला. बहरामपूर टीमचे मनःपूर्वक कौतुक.'

पहा व्हिडिओ - 

दरम्यान, एक्सवरील पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये यूजर्स रेस्क्यू टीमच्या सदस्यांचे कौतुक करताना दिसत आहेत. 22 जुलै रोजी सकाळी 9 वाजता पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 4 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि शेकडो लाईक्स मिळाले आहेत.