Ghostly Figure: ग्रुप फोटोमध्ये भूत दिसल्याने महिलेची उडाली झोप, सोशल मीडियात फोटो व्हायरल
फोटो मध्ये दिसले भूत (Photo Credits: Facebook)

Ghostly Figure: काही महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या एका पार्टीदरम्यान मित्रांसोबत क्लिक केलेल्या एका फोटोत भूतासारखी दिसणारी आकृती दिसल्याने इंग्लंडमधील एका महिलेची झोपच उडाली आहे. असे सांगितले जात आहे की, ही घटना ऑक्टोंबर महिन्यातील आहे. मात्र फोटो सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. रेबेका ग्लासबोरो (Rebecca Glassborow) हिने आपल्या मित्रमैत्रींसोबत एक पार्टा केली आणि त्या वेळी फोटो सुद्धा काढले. मात्र त्यात भूतासारखे कोणतरी दिसल्याने सर्वांचे डोळे विस्फारले गेले आहेत. सोशल मीडियात सुद्धा युजर्सने हा फोटो पाहिल्यानंतर हैराण झाले आहेत.

इंग्लंडच्या रेबेका यांनी असे म्हटले की, ज्या फ्लॅटमध्ये फोटो काढला तेथे भूतांचा वावर आहे. कारण आधी तेथे कोणाचा तरी मृत्यू झाला होता. रेबेका याच फ्लॅटच्या वरती राहते. तिने असे म्हटले की, ही भूतासारखी दिसणारी प्रतिकृती पाहिल्यानंतर रुमची उत्तम प्रकारे तपासणी ही केली. मात्र आजूबाजूला त्यांना असे की दिसले नाही.(Viral Video: एका माशाने सापाला केले गिळंकृत, त्यानंतर जे झाले ते पाहून तुम्हीही व्हाल अचंबित)

पहा फोटो-

हा फोटो वास्तवात घाबरवणारा आहे.महिलेचे असे म्हणणे आहे की, फोटोत भूताची प्रतिकृती दिसणे थोडे विचित्रच आहे. आम्ही सर्वजण घाबरलो होते आणि रुमच्या चारही बाजूंना पाहिले असता विचार आला की असे कसे होऊ शकते? आम्हाला नाही माहिती हे काय आहे. आम्हा सर्वांना असे वाटते की, येथे लांब सफेद रंगाचे केस असलेली एक महिला आहे. जी आमच्या आजूबाजूला खरंच नव्हती आणि फक्त फोटो मध्ये तिची प्रतिकृती दिसून येत होती.

या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या एका शेजारच्यांनी असे म्हटले की, तुम्हाला मृत्यू झालेल्या लोकांपेक्षा जीवंत माणसांबद्दल भीती वाटली पाहिजे. कारण मी फ्लॅटच्या वरती राहते आणि आता माझी रात्रीची झोपच उडाली आहे. मी जेव्हा रात्री झोपते तेव्हा असे वाटते की, फ्लॅटमध्ये एक डार्क फिगर उपस्थित आहे. आता रेबेकाच्या म्हणण्यानुसार या इमारतीत भूतांचा वावर असून त्यांना विचित्र आवाज सुद्धा ऐकू येतात.