Viral Video: एका माशाने सापाला केले गिळंकृत, त्यानंतर जे झाले ते पाहून तुम्हीही व्हाल अचंबित
Snake Fish (Photo Credits: Twitter)

भक्ष्य प्राण्यांमध्ये सापाचा (Snake) उल्लेखही केला जातो. सरपटणारा प्राणी म्हणून ओळख असणारा कधी आपला डाव साधून एखाद्याला भक्ष्य करेल काही सांगता येत नाही. असे असताना तुम्ही एका छोट्या माशाने सापाला गिळंकृत केले आहे असे ऐकले आहेत का? मुळात तुमचा यावर विश्वास बसणार नाही. मात्र असे घडले आहे. असा एक व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यात एका माशाने पूर्णच्या पूर्ण सापाला खाल्ले. हा खूप जुना व्हिडिओ आहे. जो पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदाने ट्विटरवर शेअर केला आहे.

या व्हिडिओला 'जर तुम्ही हा पाहिला नसाल. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. लोक हा व्हिडिओ पाहून अचंबित झाले होते. हा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.' असे कॅप्शन दिले आहे.हेदेखील वाचा- जेव्हा नागराज स्वत: दुसऱ्या जिवंत सापाला गिळायला लागला , धक्कादायक व्हिडिओ आला समोर झाला (Watch Viral Video)

हा व्हिडिओ तुम्ही नीट पाहिलात तर तुम्हाला दिसेल यात एक एका झ-याजवळ एका माशाने सापाची शिकार केली आहे. यात एक साप झुडूपांमध्ये लपलेला दिसत आहे. ज्याला बाहेर काढण्यासाठी माशा त्याच्याजवळ जातो. त्याच्या जवळ गेल्यानंतर मासा तोंडातून धूर सोडतो. त्यानंतर जसा साप झुडूपांतून बाहेर येतो तसा तो माशाच्या तोंडात जातो. हळूहळू संपूर्ण साप माशाच्या तोंडात जायला सुरुवात होते.

खरे पाहता व्हिडिओमध्ये जो साप दाखवला आहे, तो मुळात एक मासाच आहे. त्याला सिलेंडर मासा वा ईल मासा असे म्हणतात. जेव्हा छोटा मासा ईल फिशला खात होता तेव्हा त्याला काही वेळाने कळते की या माशाला आपण पूर्णपणे गिळू शकत नाही. मग हळूहळू तो मासा ईल फिशला तोंडातून बाहेर फेकण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करत आहे.