Gay Couple Marriage: तेलंगणा येथे मोठ्या धुमधडाक्यात गे कपलने केले लग्न, See Photos
Gay Couple Marriage (Photo Credits-Instagram)

Gay Couple Marriage: तेलंगणा येथे एका समलैंगिक कपलने त्यांचे गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेल्या नात्याला अखेर विवाहाच्या बंधनात अडकवले. या कपले आपल्या आनंदाच्या क्षणाची घोषणा करत असा संदेश दिला की, आनंदी राहण्यासाठी कोणाच्या ही परवानगीची गरज भासत नाही. या गे कपलच्या लग्नाचे फोटो सुद्धा सध्या सोशल मीडियात खुप व्हायरल होत आहेत. ऐवढेच नाही तर त्या दोघांसह लग्नासाठी आलेल्या मंडळींनी सुद्धा खुप धम्माल केल्याची ही फोटोंमधून दिसून येत आहे.

या कपलच्या लग्नात फक्त घरातील मंडळी आणि जवळचे मित्र यांनीच उपस्थिती लावली होती. तर सुप्रिमो चक्रवर्ती हा 31 वर्षाचा असून त्याचा पार्टनर अभय डांग हा 34 वर्षाचा आहे. दोघांनी आधी एकमेकांना अंगठ्या घातल्यानंतर एका रिजॉर्टमध्ये विवाहसोहळा संपन्न केला. त्यांच्या या लग्नाला आई-वडिलांनी सुद्धा आशीर्वाद दिले आहेत.(Viral Video: लग्नाच्या वेळी नवरीने काढल्या झोपा, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल)

याआधी सुप्रिमो याने त्याच्या बॅचलर पार्टीचे काही फोटो ही शेअर केले होते. यामध्ये ग्रु टू बी चा टॅग सुद्धा घातला होता. या दोघांचे फोटोंना युजर्सकडून मोठ्या प्रमाणात लाइक्स मिळाले आहेत. त्याचसोबत त्यांच्या जोडीला सुद्धा भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.