Ganpati of Shiv Sainik: गणपती बाप्पा 'दैनिक सामना' वाचताना, शिवसैनिकाच्या घरातील मुर्ती सोशल मीडियावर व्हायरल
Ganpati Bappa Reading Daily Saamana | (Photo Credit: Twitter)

सोशल मीडियावर (Social Media) एक गणेशमुर्ती अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. ही मुर्ती एका शिवसैनिकाच्या घरातील गणेश मुर्ती (Idol of Ganpati) असल्याचे सोशल मीडियावर बोलले जात आहे. मात्र, ही मूर्ती नेमकी कोणत्या शिवसैनिकाच्या ( Shiv Sainik) घरातील आहे याबाबत फारशी माहिती मिळू शकली नाही. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी या मुर्तीला ट्विटरवर लाईक केले आहे. तर मुख्यमंत्री कार्यालय आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या ट्विटर हँडलला हा मुर्तीचा फोटो ट्विटरद्वारे टॅग करण्यात आला आहे. छायाचित्रात दिसते की, गणपती बाप्पा शिवसेना मुखपत्र अशी ओळख असलेले दैनिक सामना वृत्तपत्र वाचत आहेत.

योगीराज खानवीलकर नामक @YogirajKhanvil4 या ट्विटर हँडलवर या खास गणपती मुर्तीचा फोटो शेअर करण्यात आला आहे. शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि शिवसैंनिकांसोबतच अनेक युजर्सनीही या फोटोला लाईक केले आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान 'वर्षा' बंगल्यावरही गणपतीचे आगमन झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे आणि चिरंजीव, पर्यटणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत या गणपीची पूजा केली. या वेळी "जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो", अशी प्रार्थना मुख्यमंत्री यांनी गणरायाच्या चरणी केली आहे. (हेही वाचा, Ganesh Chaturthi 2021 Wishes in Marathi: गणेश चतुर्थी निमित्त मराठी शुभेच्छा, Quotes, Greetings, Images शेअर करुन करा गणपती बाप्पाला वंदन!)

ट्विट

दरम्यान, गणपती बाप्पा मोरया.. , ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, ‘एक…दोन.. तीन.. चार…गणपतीचा जयजयकार’, ‘मोरया रे बाप्पा मोरया रे..’ अशा एक ना अनेक घोषणांनी वातावरण भारुन टाकत, गणेशभक्तांच्या अभूतपूर्व उत्साहात विघ्नगर्ता मानल्या जाणाऱ्या गणपती बाप्पांचे आज घराघरात आगमन झाले. कोरोना व्हायरस महामारी सारखे संकट कायम असतानाही गणेशभक्तांचा उत्साह उल्लेखनीय असल्याचे पाहायला मिळाते आहे. राज्य सरकारने जारी केलेली कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत गणेशभक्तांनी घरोघरी आपल्या लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापणा केली आहे. घराघरांमध्ये भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे.