महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) मॉन्सूनचे आगमन झाले आहे. गेले काही दिवस मुंबईमध्ये (Mumbai) मुसळधार पाऊस पडत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईकरांना खड्डे, सिंकहोल, तुंबलेले रस्ते अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी भांडूप येथे दोन महिला मॅनहोलमध्ये पडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता एका सिंकहोलमध्ये चक्क गाडी बुडाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मुंबईच्या घाटकोपर (Ghatkopar) येथे इमारतीच्या बाहेर पार्क केलेली गाडी एका मोठ्या खड्ड्यात बुडत आहे. हा खड्डा इतका मोठा आहे की, संपूर्ण कार त्यामध्ये पूर्ण बुडाली आहे.
ही घटना 13 जून 2021 रोजी रामनिवास सोसायटीमध्ये घडल्याचे सांगितले जात आहे. पावसानंतर कार जमीनीत पडल्याबाबत बीएमसीने निवेदन जारी केले आहे. या कार अपघाताशी पालिकेचा काही संबंध नाही, असे बीएमसीने सांगितले. ही घटना घाटकोपर परिसरातील एका खासगी सोसायटीमधील आहे. यासंदर्भात महापालिकेच्या संबंधित विभागीय कार्यालयामार्फत ड्रेनेजचे काम सुरू असल्याचे बीएमसीने सांगितले. ही विहीर 60 फुट खोल आहे. यासह संबंधित सोसायटीला या ठिकाणच्या सुरक्षेसाठी तातडीने आवश्यक ती पावले उचलण्यास सांगण्यात आले आहे.
Maharashtra: A viral video shows a car sinking in a sinkhole in Mumbai's Ghatkopar
Traffic Police says,"There was a well at the place. Some people covered it with concrete slab&started parking cars over it. Incident occurred due to land subsidence following rain. No one injured" pic.twitter.com/N8Tys2BrUY
— ANI (@ANI) June 13, 2021
Scary visuals from Mumbai's #Ghatkopar area where a car drowned in few seconds.#MumbaiRains pic.twitter.com/BwRBgSvNpU
— Priyathosh Agnihamsa (@priyathosh6447) June 13, 2021
घाटकोपर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत वाहतूक पोलिसांनी सांगितले की, ज्या ठिकाणी कार बुडाली तिथे एक एक विहीर होती. काही लोकांनी ती काँक्रीट आणि स्लॅबने झाकून त्यावर कार पार्क करण्यास सुरवात केली. पाऊस पडल्यानंतर इथली जमीन खचली व त्यामुळे हा अपघात झाला. या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नाही. (हेही वाचा: Bhandup मध्ये मॅनहोलमध्ये पडलेल्या 2 महिलेच्या घटनेची महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून दखल; Protective Grills ने सारी मॅनहोल सुरक्षित करणार असल्याची दिली माहिती)
दरम्यान, मुंबई सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे काल दुपारी 3 वाजता पवई तलाव ओव्हरफ्लो झाला. गेल्या वर्षापेक्षा यंदा 24 दिवस आधीच हा तलाव भरून वाहू लागला आहे. महापालिकेकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.