Frogs Marriage in Tripura: बेडूक नवरा, बेडकीन बायको; त्रिपुरामध्ये बेडकांचे लग्न (Watch Video)
Frogs Marriage | (Photo Credit: Twitter)

विज्ञान कितीही पुढे गेले तरी लोकांच्या श्रद्धा, परंपरा कायम आहेत. या श्रद्धा कधी डोळस असतात तर कधी अंध. असाच एक प्रकार त्रिपुरा राज्यात घडला आहे. इथे चक्क दोन बेडकांचे लग्न ((Frogs Marriage) लावण्यात आले. एक बेडूक (Frog) नवरा आणि दुसरा बेडूक नवरी. हे दोन्ही बेडूक नर-मादी होते की देघेही नर किंवा दोघेही मादी हे समजू शकले नाही. तसेच, त्रिपुरा राज्यातील नेमक्या कोणत्या गावात अथवा शहरात बेडकांच्या लग्नाचा (Frogs Marriage in Tripura) प्रकार घडला याबाबत ठोस माहिती नाही. परंतू, परंपरेने चालत आलेल्या या विचित्र प्रकाराचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Marriage Viral Video) झाला आहे. वृत्तसंस्था एएनआयनेही हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

घटनेचा व्हिडिओ पाहिले असता त्यात दिसते की काही लोकांनी दोन बेडकांना वेगवेगळ्या वस्त्रांमध्ये गुंडाळले आहे. इतकेच नव्हे तर लग्नात वापरतात तशा कपड्यांच्या तुकड्यांमध्ये दोन्ही बेडकांना पकडून त्यांच्या डोक्यावर हळद-कुंकू आणि अक्षता वाहण्याचाही कार्यक्रम सुरु आहे. पाऊस पडत नसेल तर म्हणे बेडकांचे लग्न लावले की तो पडतो. भारतातील अनेक प्रदेशांमध्ये बेडकाचे, गाढवांचे लग्न लावण्याची प्रथा आहे.

बेडकाचे, गाढवांचे लग्न लावल्याने खरोखरच वरुनराजा (पावसाचा देव) प्रसन्न होतो आणि पाऊस येतो याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. ही एक अंधश्रद्धा असल्याचे विज्ञानवादी अनेक लोक सांगतात. परंतू अत्यंत विचित्र अशा या पद्धतीमुळे त्या मुक्या जीवाचे मात्र नाहक हाल होतात. याकडे विशेष कोणाचे लक्ष नसते. त्रिपुरातील लोकांनीही अशाच पद्धतीने बेडकांचे लग्न लावल्याचे समजते. (हेही वाचा, कोरोना काळात 2 तासांत लग्न आटोपण्यासाठी नेटक-यांनी तयार केलेली मजेशीर नियमावली तुम्ही वाचली का?, वाचा Viral WhatsApp Forwards)

भारतात सध्या कोरोना व्हायरस महामारीची दुसरी लाट जोरत आहे. अशा वेळी विविध राज्यांनी अत्यंत कडक निर्बंध घातले आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी विवाह, यात्रा, सण उत्सव यांसारखे सार्वजनिक कार्यक्रम करण्यावरही बंदी आहे. दरम्यान, असे असले तरी त्रिपुरातील घटनेप्रमाण अनेक ठिकाणी बेडकांचे लग्न लावण्याचे प्रकार घडत आहेत.