Father's Day 2020 Google Doodle: पितृदिन 2020 (Father's Day) निमित्त आज गूगलनेही (Google) आपल्या डूडलच्या (Doodle) माध्यमातून युजर्सना डिजिटल कार्ड बनवून वडिलांना शुभेच्छा देण्याचा एक पर्याय खुला केला. कोरोना संकट आणि लॉकडाऊनमध्ये जगभरात अनेक जण त्यांच्या घरापासून, कुटूंबापासून दुरावले आहेत. त्यामुळे यंदा फादर्स डे व्हर्च्युअली साजरा करणार्या अनेकांना आज त्यांची क्रिएटीव्हिटी वापरून बाबांना सरप्राईज देता येऊ शकतं. Father's Day 2020 Wishes: 'फादर्स डे' निमित्त WhatsApp Stickers, Quotes, Images, Messages, Wallpapers आणि Greetings शेअर करून बाबांना द्या शुभेच्छा!
डिजिटल बनवण्याच्या या प्रयत्नामध्ये अनेक जण नॉस्टॅल्जिक देखील झाले आहेत. आयुष्यात अनेकदा लहानपणी अनेक कार्यक्रमासाठी हॅन्ड मेड ग्रिटींग्स बनवली असतील पण यंदा एकमेकांना सुरक्षित ठेवण्यासाठी अनेकांना त्यांच्या वडिलांपासून दूर रहावं लागतं आहे.(Father's Day 2020 Gift Ideas: फादर्स डे दिवशी बाबांना खूष करण्यासाठी बनवू शकता या घरच्या घरी भेटवस्तू!)
आजच्या फादर्स डे स्पेशल गुगल डूडलवर तुम्ही क्लिक केलं की एक क्राफ्ट पेज ओपन होतं. यामध्ये डुडल हार्ट्स, फुलं, बटण्स, पाणघोडा ते अगदी डोन्ट्स पर्यंत अनेक गोष्टींचा वापर करून तुम्ही पर्सन्लाईज्ड कार्ड बनवू शकता. हे कार्ड सोशल मीडियामध्ये किंवा ईमेल द्वारा शेअर देखील करू शकता. Father's Day 2020 Cake Ideas: फादर्स डे निमित्त घरच्या घरी केक बनवून बाबांना सरप्राईज देण्यासाठी पहा Easy Tutorial Video!
गूगल डुडल यंदा 8व्यांदा फादर्स डे सेलिब्रेट करत आहे. 1508 पासून फादर्स डेचं सेलिब्रेशन सुरू झालं आहे. दरम्यान जून महिन्याच्या तिसर्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. यंदा 21 जून दिवशी जगभरात फादर्स डे सेलिब्रेट होणार आहे. त्यानिमित्त अनेकांनी बाबांना सरप्राईज देण्यसाठी खास प्लॅनिंग केलं आहे.