काय सांगता? मुलांना 'Sex Education' देण्यासाठी त्यांच्यासोबत Porn Videos पाहते प्रसिद्ध गायिका Yuni Shara
Yuni Shara (Photo Credits: Instagram)

आपल्या समाजामध्ये अजूनही ‘सेक्स’ (Sex) या विषयावर उघडपणे बोलले जात नाही. पॉर्न व्हिडीओ (Porn Videos) देखील अशी गोष्ट आहे ज्याबाबत आपले विचार शेअर केल्यास कदाचित आपल्याला ‘जज’ करण्यात येऊ शकते. मात्र इंडोनेशियामधील (Indonesia) एक प्रसिद्ध गायिका आपल्या मुलांना लैंगिक शिक्षणाबद्दल जागरूक करण्यासाठी त्यांच्यासोबत अश्लील व्हिडिओ पाहत आहे. 49 वर्षीय पॉपस्टार यूनी शारा (Yuni Shara) ने स्वतः ही माहिती दिली आहे. देशातील प्रसिद्ध यू ट्यूबर वेन्ना मेलिंडाला दिलेल्या मुलाखतीत, यूनी शाराने या वादग्रस्त पालकत्वाबाबत खुलासा केला.

या प्रसिद्ध गायिकेने सांगितले की, तिला जुन्या रूढी-परंपरा मान्य नाहीत. म्हणूनच वास्तविक जीवनात लैंगिक शिक्षण देण्यासाठी ती आपली दोन मुले केविन आणि सेलो सियाहान यांच्याबरोबर पॉर्न व्हिडीओ पाहते. तिने सांगितले की, आजच्या काळात हे अशक्य आहे की कोणते वयात आलेले मुल पॉर्न पाहत नाही. त्यामुळे मुलांना याबाबत जागरूक करण्यासाठी तिने स्वतः त्यांच्यासोबत असे व्हिडीओ पाहण्याचा निर्णय घेतला. शाराला असेही वाटते की, तिच्या मुलांनी पुराणमतवादी बनण्याऐवजी आधुनिक विचारवादी बनले पाहिजे.

 

View this post on Instagram

 

A post shared by WahyuSetyaningBudi✨ (@yunishara36)

महत्वाचे म्हणजे कोणत्या प्रकारचे पॉर्न व्हिडीओ मुलांना आवडतात याबाबतही ती आपल्या मुलांशी चर्चा करते. मात्र शाराच्या या थोड्या हटले पालकत्वाच्या शैलीने वादाला तोंड फोडले आहे. तिच्या या विचारांबाबत सोशल मीडियावर अनेक चित्र-विचित्र प्रतिक्रिया उमटत आहेत. परंतु इंडोनेशियाच्या एका संस्थेतील सुप्रसिद्ध मूल आणि किशोरवयीन शिक्षण तज्ञ अ‍ॅगॅस्ट्रिड पीटर यांनी शाराचे कौतुक केले आहे. (हेही वाचा: Vitality T20 Blast सामन्यादरम्यान महिला प्रेक्षकासोबत पुरुषाकडून गैरवर्तन; कृत्य कॅमेऱ्यात कैद, सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल)

अ‍ॅगॅस्ट्रिड म्हणाले की, मुले पॉर्न व्हिडीओ पाहत आहेत ही गोष्ट आपल्या समजली तर त्यांच्यावर रागावू नये किंवा त्यांना त्यापासून रोखू नये. असे झाल्यास मुले ती गोष्ट लपवून करतात. त्यामुळे चर्चेच्या माध्यमातून पालकांनी त्यांना लैंगिक शिक्षण द्यावे. यूनी शाराची दोन्ही मुले 19 व 16 वर्षांची आहेत.