Representational Image | (Photo Credits: File Image)

मुंबई (Mumbai) मध्ये तौक्ते चक्रीवादळाच्या (Cyclone Tauktae प्रभावामुळे काल संध्याकाळपासूनच जोरदार वारे वाहत आहेत. तर पावसाचा देखील जोर दुपारी वाढला होता. सोसाट्याच्या वार्‍यामुळे अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडणं, झाडं कोसळणं अशा घटना समोर येत आहेत. पण या परिस्थितीचा फायदा घेत काही समाजकंटकांकडून मुंबईत ट्रायडंट हॉटेल (Trident Hotel) परिसरामध्ये गाड्यांवर काही भाग कोसळून प्रचंड नुकसान झाल्याचा व्हिडिओ वायरल होत आहे. पण व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) वर वायरल होणारा हा व्हिडिओ खोटा असल्याचं सांगण्यात आले आहे. AIR News Mumbaiच्या ट्वीटर अकाऊंट प्रमाणेच काही अन्य ट्वीटर वरील युजर्सनी हा व्हिडिओ खोटा असल्याचं सांगितलं आहे. मुंबईच्या ट्रायडंट भागात अशाप्रकारे कोणतीही घटना घडलेली नाही त्यामुळे सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर वायरल होत असलेल्या जुन्या क्लिप वर विश्वास ठेवू नका तसेच ती फॉरवर्ड करू नका.

AIR News Mumbai ट्वीट

व्हीडीओ जुना असल्याचा दावा

दरम्यान Pankaj Jain ने ट्वीट करत हा अरब मधील मदिना भागातील जुलै 2020 चा जुना व्हीडीओ असल्याचं म्हटलं आहे. (नक्की वाचा :अंधेरीत वॉटरलॉगिंग झाल्याने संतप्त झालेल्या महिलेने वापरले अपशब्द, पोलिसांनी ट्विट करत दिले असे उत्तर).

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज पूर्व मध्य अरबी समुद्रात वादळी वाऱ्याचा वेग ताशी 180–190 किमी वर पोचण्याची शक्यता असून हा वेग ताशी 210 किमी वर जाण्याची शक्यता महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर 17 मे रोजी ताशी 80–90 किमी वेगाने वारे वाहणार असून हा वेग ताशी 100 किमी वर जाण्याची शक्यता त्यानंतर हा वेग मंदावेल. पण या वार्‍यासोबत पाऊस देखील बरसत असल्याने आज अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचेही पहायला मिळालं आहे.