Fake Photo of Father Stan Swamy (Photo Credits: Twitter)

Father Stan Swamy यांचे निधन झाले आहे. दरम्यान एल्गार परिषद प्रकरणी जामिनावर सुनावणी असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सध्या सोशल मीडीयामध्ये एक वयोवृद्ध व्यक्ती हॉस्पिटल मध्ये बेडला साखळीने बांधलेल्या अवस्थेमध्ये असा एक फोटो वायरल होत आहे. या फोटोमधील व्यक्ती Father Stan Swamy, असल्याचाही दावा केला जात आहे. मात्र तो दावा खोटा आहे.त्यांना अखेरच्या काळात अमानुष वागणूक दिल्याचा खोटा दावा केला जात आहे.

boomlive च्या रिपोर्ट्सनुसार, सध्या वायरल होत असलेला फोटो हा Father Stan Swamy यांचा नसून उत्तर प्रदेशातील 92 वर्षीय एका खूनी आरोपीचा आहे. सध्या सोशल मीडियामध्ये अनेक प्लॅटफॉर्मवर Father Stan Swamy यांना शेवटच्या काळात छ्ळल्याचा दावा करत फोटो वायरल करत असल्याचं पहायला मिळालं आहे.

2018 च्या भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये Father Stan Swamy यांना ऑक्टोबर 2020 पासून तुरूंगात ठेवले होते. त्यांच्याकडून बॉम्बे हाय कोर्टात काल याची माहिती देण्यात आली. कोविड 19 ची लागण झाल्यानंतर त्यांना वांद्रे येथे होली फॅमिली हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. मागील काही दिवसांत त्यांची प्रकृती खालावली आणि ते वेंटिलेटर वर होते.

Father Stan Swamy यांच्या फोटोचा खोटा दावा

काल (5 जुलै) दिवशी कोर्टाला दिलेल्या माहितीमध्ये फादर स्टेन स्वामी यांचा मृत्यू कार्डिएक अरेस्टने झाल्याचं सांगण्यात आले आहे. समाजातील दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांकाना मानाने जगता यावं म्हणून त्यांनी आयुष्यभर काम केले होते. भीमा कोरेगाव हिंसाचाराचं कनेक्शन 31 डिसेंबर 2017 च्या रात्री पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेशी लावण्यात आले आहे. पोलिसांचा दावा आहे की यावेळी झालेल्या संतप्त भाषेतील भाषणामुळे दुसर्‍या दिवशी सकाळी हिंसाचार झाला. यामध्ये भारतभरातून अनेक माओवादी देखील ताब्यात घेण्यात आले आहेत.