उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजपमध्ये वरचेवर सभांच्या फेऱ्या सुरु आहेत. या सर्वांच्या दरम्यान यूपीच्या विभाजनाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. काही लोकांचा दावा आहे की 2022 मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशला विभागून पूर्वांचल (Purvanchal) आणि बुंदेलखंड वेगळे होतील. मात्र आता उत्तर प्रदेशच्या माहिती विभागाने या संदेशाचे खंडन केले आहे. उत्तर प्रदेशच्या विभाजनाबाबत ज्या शक्यता उपस्थित केल्या जात आहेत, त्या निराधार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पीआयबी फॅक्ट चेकनेही ट्वीट करत हा संदेश खोटा असल्याचे सांगितले आहे. त्यांनी एक फोटो ट्वीट केला आहे, ज्यामध्ये युपीच्या विभाजनाची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘उत्तर प्रदेशचे 2-3 भागात विभाजन करण्याचा विचार सुरु आहे. याबाबत पीएम मोदी व सीएम योगी आदित्यनाथ यांच्या बैठका सुरु आहेत. त्यामुळे पूर्वांचल नावाचे नवे राज्य निर्माण होईल. सीएम योगी यांचा बालेकिल्ला गोरखपूर हा नव्या राज्यात सामील होईल. याआधी तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी असा प्रस्ताव मांडला होता मात्र त्यावेळी तो बारगळला. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी युपीचे विभाजन होईल.’
एक खबर में दावा किया गया है कि केंद्र सरकार उत्तर प्रदेश को 2-3 हिस्सों में विभाजित करने और पूर्वांचल को अलग राज्य बनाने पर विचार कर रही है।#PIBFactCheck: यह दावा #फ़र्ज़ी है। केंद्र सरकार, उत्तर प्रदेश के अलग हिस्से करने से संबंधित कोई विचार नहीं कर रही है। pic.twitter.com/tKnKKrHJRA
— PIB Fact Check (@PIBFactCheck) June 12, 2021
(हेही वाचा: Covid-19 लस घेतल्यावर शरीरात चुंबकीय शक्ती निर्माण होते? जाणून घ्या या व्हायरल मेसेजमागील सत्य)
पीआयबी फॅक्ट चेकने हा दावा बनावट असल्याचे सांगितले आहे. उत्तर प्रदेशच्या विभाजनाबाबत केंद्र सरकार काही विचार करत नाही असे त्यांनी म्हंटले आहे. दरम्यान सध्या सोशल मिडियावर कोरोना विषाणू महामारी व लसीकरण याबाबत अनेक खोटे मेसेजेस व्हायरल होत आहेत. पीआयबीने कोणतेही संदेश खात्री केल्याशिवाय पुढे न पाठवण्याचे आवाहन केले आहे.