Fact Check: मुंबई पोलिसांच्या नावाने व्हायरल होणारी 'ती' Audio Clip खोटी; क्लिप शेअर न करण्याचे पोलिसांचे आवाहन
Fake audio message (Photo Credits: Twiiter)

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकटामुळे आधीच काळजीत असणाऱ्या लोकांना सोशल मीडियावर फिरणारे फेक मेसेजेस अधिकच गोंधळात टाकतात. सध्याच्या कोरोना व्हायरसच्या भयंकर संकटात अनेक फेक मेसेजस, ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फिरु लागल्या आहेत. त्यामुळे लोक अधिक पॅनिक होत आहेत. अशीच एक ऑडिओ क्लिप मुंबई पोलिसांच्या नावाने व्हायरल होत आहे. यातील मेसेज मुंबई पोलिस आयुक्तांकडून देण्यात आल्याचा दावा यात करण्यात आला आहे. मात्र यातील मेसेज पूर्णतः खोटा आहे. शेअर करण्यात आलेली क्लिप खोटी असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी ट्विट करुन याची माहिती दिली आहे. कालही अशाच प्रकारची एक ऑ़डिओ क्लिप शेअर करण्यात आली होती.

काल शेअर केलेल्या ऑडिओ क्लिपप्रमाणे ही देखील क्लिप फेक आहे. असा कोणत्याही प्रकारचा मेसेज पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडून देण्यात आलेला नाही. त्यामुळे ही क्लिप कृपया शेअर करु नका, असे आवाहन मुंबई पोलिसांनी ट्विट करत केले आहे. (Fact Check: कोरोना व्हायरस लॉकडाऊन कालावधी महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत? व्हायरस बातमीमागचे सत्य काय?)

Mumbai Police Tweet:

यापूर्वी अशा प्रकराचे अनेक फेक मेसेजेस सोशल मीडियावर व्हायरल होत होते. दरम्यान कोणत्याही माहितीची पडताळणी केल्याशिवाय ती शेअर किंवा फॉरवर्ड करु नका. अफवांमुळे संकट अधिक तीव्र होऊ शकते. त्यामुळे पोलिस आणि शासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करुन या संकटावर मात करण्यासाठी त्यांना सहकार्य करा.