Fact Check: ऊर्जा मंत्रालयाकडून Grade-1 Assistant Engineer साठी अपॉइंटमेंट लेटर जारी; PIB ने केला खुलासा
PIB Fact Check (Photo Credits: Twitter)

ऊर्जा मंत्रालयाकडून (Ministry of Power) कोणतं अपॉईंटमेंट लेटर (Appointment Letter) किंवा ईमेल (E-mail) आला असेल तर सावधान! दरम्यान, तरुणांना ईमेल द्वारे एक अपॉईंटमेंट लेटर पाठवण्यात येत आहे. हे लेटर ऊर्जा मंत्रालयाकडून पाठवण्यात आल्याचा दावा यात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे लेटर इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांना पाठवण्यात येत आहे. ग्रेड-1 असिस्टंट इंजिनियर पदासाठी (Grade-1 Assistant Engineer) नियुक्त करण्यात आल्याचे ऊर्जा मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या अपॉईंटमेंट लेटर मध्ये म्हटले आहे. दरम्यान, पीआयबीने (PIB) यामागील सत्यता तपासली आहे.

पीआयबीने फॅक्ट चेक मध्ये सांगितले की, हे अपॉईंटमेंट लेटर फेक आहे. ऊर्जा मंत्रालयाकडून अशा कोणत्याही प्रकारचे अपॉईंटमेंट लेटर जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे ऊर्जा मंत्रालयाच्या नावाने येणारे अपॉईंटमेंट लेटर किंवा त्यासंदर्भातील मेल खोटा आहे. त्यामुळे अशा खोट्या दाव्यांपासून सतर्क रहा. (Fact Check: दिल्लीतील 200 पोलीस कर्मचाऱ्यांची एकाच वेळी नोकरी सोडली? जाणून घ्या व्हायरल बातमी मागील सत्य)

Fact Check By PIB: 

प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो (PIB)कडून करण्यात आलेले फॅक्ट चेकद्वारे व्हायरल होणारे हे दावे खोटे आणि निराधार असल्याचे सिद्ध झाले आहे. ऊर्जा मंत्रालयाकडून अशा प्रकारचे कोणतेही लेटर जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या दाव्यांवर विश्वास ठेवू नका. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता आहे.