बायो केमिक एज्युकेशन ग्रँड कमिशनने (Bio Chemic Education Grant Commission) एक नोटीफिकेशन जारी केले आहे. भारत सरकार (Indian Government) नोकरीची संधी देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून हे नोटीफिकेशन शेअर केले जात आहे. ही संस्था केंद्र सरकारचा भाग असल्याचे यात म्हटले आहे. बायो केमिक एज्युकेशन ग्रँड कमिशन भारत सरकारसह (Indian Government) नोकरीची संधी देत असल्याचे या व्हायरल नोटीफिकेशनमध्ये म्हटले आहे.
प्रेस इनफार्मेशन ब्यूरोने यामागील सत्याची पडताळणी केली असून ही माहिती खोटी असल्याचे म्हटले आहे. तसंच भारत सरकारचा भाग असल्याचा दावा करणारी बायो केमिक एज्युकेशन ग्रँड कमिशन ही संस्था फेक असल्याचे सांगण्यात आले आहे. ही कंपनीच खोटी असल्याने हा दावा देखील खोटा असल्याचे स्पष्ट होते. (Fact Check: कलम 341 हटवण्याचा सरकारचा विचार? जाणून घ्या व्हायरल WhatsApp Message मेजेस मागील सत्य)
Fact Check By PIB:
A notification issued by 'Bio Chemic Education Grant Commission' is claiming to offer employment under the Government of India. #PIBFactCheck: This organization is #Fake and is projecting itself to be a body of the Government of India.
Read here https://t.co/7BjC0dnlDr pic.twitter.com/NoyvbT8gp9
— PIB Fact Check (@PIBFactCheck) April 13, 2021
यापूर्वी देखील अशा प्रकारच्या अनेक फेक न्यूज समोर आल्या आहेत. त्याद्वारे लोकांची फसवणूकही केली जाते. त्यामुळेच सरकार आणि सरकारच्या विविध अधिकाऱ्यांकडून लोकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात येते. अधिकृत वेबसाईट वगळता इतर कोणत्याही माहितीवर विश्वास न ठेवण्याचे सांगण्यात आले आहे. तसंच सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांनी देखील नोकरी संदर्भातील कोणत्याही माहितीकरणा संबंधित अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.