सरकार कलम 341 (Section 341) काढून टाकणार असल्याचा व्हायरल मेसज सध्या सोशल मीडियावर (Social Media) फिरत आहे. सरकारने हे कलम हटवल्यानंतर एससी (SC), एसटी (ST) आणि ओबीसी (OBC) कॅटेगरीच्या सर्व सुविधा रद्द करण्यात येतील, असे या मेसेजमध्ये म्हटले आहे. या कॅटेगरी मधील सर्व व्यक्तींनी सरकारविरुद्ध लढण्यास तयार राहण्याचे आवाहन देखील या मेसेजमध्ये करण्यातस आले आहे. (Fact Check: कोविड-19 ची नुकसान भरपाई म्हणून 1.60 कोटी रुपयांचे बक्षीस मिळवण्यासाठी RBI कडून Personal आणि Bank Account डिटेल्सची मागणी? PIB ने सांगितले सत्य)
व्हायरल होणाऱ्या या व्हॉट्सअॅप मेसेजची पडताळणी प्रेस इनफार्मेशन ब्यूरोकडून (Press Information Bureau) करण्यात आली आहे. त्यानंतर हा व्हायरल मेसेज फेक असल्याचे पीआयबीने म्हटले आहे. केंद्र सरकारकडून कलम 341 हटवण्याबाबत कोणताही निर्णय किंवा आदेश देण्यात आलेला नाही, असे पीआयबीने स्पष्ट केले आहे.
Fact Check By PIB:
एक #WhatsApp मैसेज में दावा किया जा रहा है कि केंद्र सरकार धारा 341 को हटाने जा रही है। #PIBFactCheck: यह दावा #फ़र्ज़ी है। केंद्र सरकार द्वारा धारा 341 हटाने हेतु कोई प्रस्ताव नहीं दिया गया है। ऐसे भ्रामक संदेशों को साझा न करें। pic.twitter.com/FBsz1Okjjc
— PIB Fact Check (@PIBFactCheck) April 9, 2021
सरकार आणि इतर अनेक संस्थांनी अशा व्हायरल होणाऱ्या खोट्या मेसेजपासून सावध राहण्याचे आवाहन लोकांना केले आहे. सोशल मीडियावर पसरणाऱ्या चुकीच्या माहितीवर लोकांनी विश्वास ठेऊ नये. प्रत्येक मेसेजची तपासणी सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करावी. सरकारकडून निघालेले आदेश किंवा नोटीफिकेशन यांच्यावर विश्वास ठेऊन इतर कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.