Elvish Yadav SLAPS Video PC Twitter

Elvish Yadav Slaps Youth: बिग बॉस OTT 2चा विजेता आणि लोकप्रिय YouTuber एल्विश यादव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका तरुणाला थप्पड मारल्याचा एल्विश यादववर आरोप केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना रविवारी 11 फेब्रुवारी जयपूरमधील एका रेस्टॉरंटमध्ये घडली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, एल्विश एका तरुणाला कानाखाली मारत आहे. त्यांच्यात नेमका वाद कशाने झाला हे अद्याप समजले नाही. मात्र, पीडिताने एल्विश यादववर काही विचित्र कंमेट केल्यावरून त्यांच्या वाद झाला. (हेही वाचा-  'वर्षा'वर एल्विश यादवच्या हस्ते आरती;

एल्विशला राग अनावर झाल्याने त्याने तरुणाला कानाखाली लगावली असं सांगण्यात आले आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर युजर्स आणि त्याचे चाहते देखील या व्हिडिओवर एल्विशवर संताप व्यक्त करत आहे. घटनास्थळी पोलिस ही उपस्थित असल्याचे दिसत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, शेवटी एल्विशला त्याच्या मित्राने खेचून रेस्टॉरेंटच्या बाहेर नेले आहे. या व्हिडिओनंतर त्याने एक ओडियो पोस्ट केला आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्याने प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर त्याने एक ओडियो पोस्ट केला आहे. ज्यात त्याने सांगितले की, मला भांडणाचा शौक नाही किंवा कोणालाही मारण्याचा शौक नाही, मी माझ्या कामात व्यस्त राहतो. जो फोटो काढालाया सांगतो तेव्हा आम्ही फोटो काढतो पण जर मागून कोणीही कंमेट करत असेल तर त्याला माफ करणार नाही.